चंदगड तालुक्यातील ६ गावात चावडी बांधकामासाठी एक कोटी रुपये मंजुर - चंदगड लाईव्ह न्युज

06 July 2021

चंदगड तालुक्यातील ६ गावात चावडी बांधकामासाठी एक कोटी रुपये मंजुर

पालकमंत्री सतेज पाटील


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

              तलाठी कार्यालयाशी गावागावांमध्ये शेतकरी तसेच ग्रामस्थांचा विविध कामासाठी नेहमीच संपर्क येतो. यामुळे या चावडी इमारत बांधकाम होणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन चंदगड तालुक्यातील चंदगड, हेरे, कोवाड, निट्टूर, आमरोळी व शिरोली सजातील चावडी बांधकामासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून एक कोटी ३ लाख सतरा हजार ४८० रुपये मंजुर झाल्याची माहीती राष्ट्रीय काॅग्रेस चे जिल्हा सरचिटणीस तथा पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे यांनी दिली. 

        पावसाळी अधिवेशनात २०२१-२२ मधील पुरवणी मागणीमध्ये सदर निधीची  तरतूद झालेली आहे. चंदगड तालुक्यातील सजातील मधील चावडी बांधकामांसाठी निधी मिळावा यासाठी श्री. गुरबे यांनी ४ जानेवारी २१रोजी मंत्री सतेज पाटील यांना निवेदन दिले होते. त्यानुसार चंदगड ( १५लाख५७७०), हेरे(१५लाख५७०००), कोवाड १५लाख ५७१००),  आमरोळी (१५लाख३०६००), निट्टूर (१५लाख ६००००), शिरोली (१५ लाख ५७०००) या सजामधून चावडी बांधकामासाठी असा निधी मंजूर झाला आहे. याकामी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचेही सहकार्य लाभले.No comments:

Post a Comment