कोरोना काळात डॉक्टरांचे योगदान मोठे - सौ. पुष्पा नेसरीकर, रवळनाथ हाऊसिंगतर्फे डॉक्टरांना सन्मानपत्र' - चंदगड लाईव्ह न्युज

06 July 2021

कोरोना काळात डॉक्टरांचे योगदान मोठे - सौ. पुष्पा नेसरीकर, रवळनाथ हाऊसिंगतर्फे डॉक्टरांना सन्मानपत्र'

कोरोना काळात डाॅक्टरांनी दिलेल्या सेवेबद्दल डाॅ. अनिल पाटील यांचा सन्मान करताना शाखाध्यक्षा सौ. पुष्पा नेसरीकर, दीपक शिंदे.

चंदगड  / सी. एल. वृत्तसेवा

         कोरोनाच्या जागतिक महामारीत डॉक्टरांनी स्वतःसह आपल्या कुटुंबाची पर्वा न करता अव्याहतपणे सेवा देऊन अनेकांना जीवदान दिले.  कोरोना काळातील डॉक्टरांचे योगदान मोठे आहे. असे मत श्री रवळनाथ को ऑप हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या चंदगड शाखाध्यक्षा सौ. पुष्पा निंगाप्पा नेसरीकर यांनी व्यक्त केले.

        रवळनाथ सोसायटीतर्फ डॉक्टरांच्या क्लिनीक व निवासस्थानी भेट देऊन सन्मानपत्रासह गौरव करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड मधील डॉक्टराचा सन्मान करण्यात आला. चंदगड येथील डॉ. अनिल पाटील म्हणाले, ``प्रत्येक रूग्णाला जीवदान देणे हे आमचे आद्यकर्तव्य आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीत सर्वांनी मिळून लढा देऊ. चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयाचे डॉ. एस. एस. साने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत, डॉ. अनिल पाटील, डॉ. मेघना पाटील, डॉ. सुप्रिया देसाई, डॉ. विशाल देसाई, डॉ. आर. जे. गौडद, डॉ. दिपक पाटील, डॉ. सुनिल हासुरे, डॉ. संतोष गायकवाड, डॉ. सुभाष पाटील, डॉ. सुनिल परीट, डॉ. देवकुमार सुर्यवंशी, डॉ. भगवान पाटील, डॉ. राजाराम गावडे, परशराम गावडे, डॉ. विरूपाक्ष दुगाणी यांच्यासह अन्य डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. शाखाधिकारी दिपक शिंदे यांनी आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment