तेऊरवाडी येथे अडीच लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्कची कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

06 July 2021

तेऊरवाडी येथे अडीच लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

तेऊरवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत अडीच लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. 

माणगाव / सी. एल. वृत्तसेवा

           राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने नेसरी कोवाड मार्गावर तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे कारवाई करत २ लाख ४४ हजार ८०० रुपयांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त केले. भरारी पथकाने या कारवाईमध्ये एक मोटार, मोबाईल असा सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईच्या भितीने वाहन चालकाने पलायन केले. मात्र गाडीत सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे भरत संतु पाटील (रा. हडलगे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) व अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

      याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी मध्यरात्रीपास नेसरी कोवाड रोडवर राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी गस्त घालत होते. तेऊरवाडी हददीत मराठी शाळेजवळ रोडवर एक मोटार संशयास्पदरित्या थांबल्याचे दिसून आले. या वाहनाची चौकशी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी जात असताना वाहन चालकाने पलायन केले. या वाहनाची तपासणी केली असता गोवा बनावटीचे विविध कंपन्यांचे  २ लाख ४४हजार ८०० रुपये किंमतीचे मद्य मिळून आले. तर दारु वहातूक करण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन, मोबाईल असा ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासात यातील मद्य पुरवठादार व्यक्तींचा शोध घेण्यात येत असल्याचे पथक प्रमुख निरीक्षक संभाजी बरगे यांनी सांगितले. सदर कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज श्री. इंगळे व राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, कोल्हापूरचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, जवा संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळेल, जय शिनगारे, मारुती पोवार, राहुल संकपाळ यांच्या टीमने केली.

No comments:

Post a Comment