कवितेचे नाव - कोरोनासूर, कालकुंद्री, येथे कविता लेखन स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावलेली कोरोनावरील कविता. - चंदगड लाईव्ह न्युज

15 July 2021

कवितेचे नाव - कोरोनासूर, कालकुंद्री, येथे कविता लेखन स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावलेली कोरोनावरील कविता.

 
कोरोनासुर

         ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर आयोजित कविता लेखन स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावलेली ज्वलंत सामाजिक प्रश्नावर आधारित कविता 'कोरोनासूर'

       सध्या जगभर कोरोना विषाणू ने हाहाःकार माजवला आहे. कोरोनामुळे जगात लाखोंच्या संख्येने लोक मृत्युमुखी पडत आहेत. अशा या ज्वलंत सद्यस्थितीवर आधारित कालकुंद्री येथील कवी सुशांत पाटील यांनी कविता लेखन स्पर्धेच्या निमित्ताने लिहिलेली 'कोरोनासूर' ही कविता समाज भावनेची जाणीव करून देणारी आहे. ही प्रबोधनात्मक कविता आपल्या अंतःकरणाचा ठाव घेणारी ठरावी.


                कोरोना सूर


सगळं चाललं होतं व्यवस्थित,

 सगळेच होते आपल्या मस्तीत.

निसर्ग सगळं स्वखुशीने देत होता,

तरी मानव त्याला ओरबाडून घेत होता.


एके दिवशी,

एक भला मोठा राक्षस आला चालून धरतीवर.

खूपच घमंड त्याला आपल्या किर्तीवर.

मानवानं त्याला नकळत पोसला, वाढवला होता,

अमरत्वाचे वरदान घेऊनच तो आला होता.


नाव होतं त्याचं 'कोरोनासुर',

असुरांचा असुर अशी त्याची ख्याती सर्वदूर.

प्रथम त्यांनं मानवावरच केला जोरदार प्रहार,

संपूर्ण धरतीवर पसरवला हाहाकार!


चिंतेत पडले सारे देवगण,

श्री विष्णूकडे गेले केले सर्वांनी प्रस्थान.

 सुचवावा रामबाण उपाय यावर,

असुराला वधन्या घ्यावा नवीन अवतार,

भगवंत आले धरतीवर.


डॉक्टर, नर्सेस आणि पोलिसांचे रूप केले धारण,

सांगितले सर्वांना, निघू नका घराबाहेर विनाकारण.

जर सर्वजण राहिलो सावध,

तरच होईल कोरोनासुराचा वध.

अशामुळे 'कोरोनासुर' गुदमरू लागला,

आणि तिथल्या तिथं मरु लागला.


पण मानवच निघाला मूर्ख,

चालून जाऊ लागला भगवंतावर!

मारू लागला, थुंकु लागला,

आपल्याला वाचवणाऱ्या देवांवर.

विश्वास ठेवू लागला, बेभरवशाच्या अफवांवर.


देऊ लागला भगवंतांना आव्हान,

परत मिळू लागले असुराला जीवदान!


या अज्ञानाला म्हणावं तरी काय?

यामुळेच कोरोना पसरतोय पुन्हा आपले हात पाय.

हीच वेळ आहे एकमेकांना सावरायची

सर्वांनी मिळून कोरोनाला हरवायची!

                       
कवी -  सुशांत राजाराम पाटील, कालकुंद्री (ता. चंदगड)
                                                                                                       No comments:

Post a Comment