दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता, विद्यार्थ्यांच्यामध्ये उत्सुकता, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

15 July 2021

दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता, विद्यार्थ्यांच्यामध्ये उत्सुकता, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहीती


तेऊरवाडी  / एस. के. पाटील

        कोरोणाच्या पार्श्वभूमिवर बोर्ड परिक्षा न झालेल्या  महाराष्ट्र राज्याच्या एस.एस.सी. बोर्डाचा दहावीचा निकाल शुक्रवारी दि. १६ जूलै २०२१ रोजी दुपारी  १ वाजता जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

            महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी दुपारी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांच्या निकालाची घोषणा होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबतची माहिती देवून सर्व विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या आहेत.

     सन २०२१ साली दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 4 हजार 441 विद्यार्थी उपस्थित होते. करोना पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्याने मूल्यांकन पद्धतीनुसार हा निकाल लागणार आहे. यापैकी साधारण 15 लाख 92 हजार 418 हून अधिक विद्यार्थ्यांचे गुण कॉम्प्युटर सिस्टीममध्ये अपलोड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.कोरोनामुळे १० वी परीक्षा रद्द करण्यात  आल्या होत्या . पण मुल्यांकन पद्धतीचा वापर करून सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय शासनाकडून  घेण्यात आला . त्यानुसार १० जून ते ३ जुलै पर्यंत शाळा स्थरावर मुल्यांकनाचे काम पुर्ण करण्यात आले.  यानंतर शाळानी संगणक प्रणालीमध्ये गुण भरले व ते विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आले. राज्य स्तरावर १५ जुलै पर्यत निकाल तयार करण्यात आला. तसेच हा निकाल शाळानी बोर्डाकडे पाठवला. या वर्षा लेखी परीक्षा झाली नसली तरी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे राज्यातील शाळानी जवळपास १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्याचा निकाल बोर्डाकडे पाठवला होता . यामध्ये ९०९९३९ इतके विद्यार्थी तर ७४८६९३ इतक्या विद्यार्थिनी आहेत . या सर्व विद्यार्थ्याचा निकाल उद्या जाहिर केला जाणार आहे . हा निकाल बोर्डाच्या htps/result.mh.ssc.ac.in  या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.



2 comments:

Unknown said...

F101847

Unknown said...

Samrudhi mukund yallulakar

Post a Comment