शासनाने खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्हयांत राबविण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक 15 जुलै 2021 अशी होती. तथापि, केंद्र शासनाचे दिनांक 15 जुलै, 2021 चे पत्रान्वये योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची मुदत वाढवून ती दिनांक 23 जुलै 2021 अशी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही एक संधी पात्र झाली आहे.
शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षण मिळणेस्तव प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. त्याकरिता तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँक / आपले सरकार सेवा केंद्राशी (CSC) संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment