पन्हाळगडाचा वेढा घटनेला उजाळा, 'नरवीर शिवा काशीद' पुण्यस्मरण दिन - चंदगड लाईव्ह न्युज

15 July 2021

पन्हाळगडाचा वेढा घटनेला उजाळा, 'नरवीर शिवा काशीद' पुण्यस्मरण दिन

नरवीर शिवा काशीद यांची यांच्या प्रतिमेचे पूजन प्रसंगी नाभिक समाज मंडळाचे पदाधिकारी व मान्यवर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

        स्वामिनिष्ठ नरवीर शिवा काशीद यांच्या ३६१ व्या स्मृतिदिनानिमित्त माणगाव (ता. चंदगड) येथे अभिवादन करण्यात आले. पं. स. उपसभापती मनीषा शिवणेकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

     पन्हाळगडावर सिद्दी जोहरच्या वेड्यात अडकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सुखरूप सुटका करण्यासाठी गडावरील नाभिक समाजाचे शिवाजी काशीद हे तोतया शिवाजी बनून सिद्धी जोहरच्या भेटीला गेले. यामुळे वेढा शिथील होताच शिवरायांना वेढ्यातून सुटण्याची संधी मिळाली. तथापि आपली फसगत लक्षात येताच चिडलेल्या सिद्धी जोहरने शिवा काशीद यांची खांडोळी केली. शिवा काशिद व घोडखिंडीत लढणाऱ्या बाजीप्रभूंसह ३०० बांदल मावळ्यांच्या बलिदानामुळे शिवराय सुखरुप विशाळगडावर पोहोचले. इतिहासातील या अलौकिक घटनेला ३६१ वर्षे पूर्ण झाली. परिणामांची कल्पना असूनही प्राणांची आहुती देणारे हे नरवीर स्वामीनिष्ठेची प्रतीक ठरले. या वीरांचे बलिदान अजरामर राहील.

          संत सेना महाराज नाभिक समाज मंडळ माणगाव च्या सभागृहात जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा बामणे यांच्या अध्यक्षतेखालील अभिवादन कार्यक्रम प्रसंगी अनिल शिवनगेकर, सुनिल सप्ताळे, महादेव ना शिवनगेकर, योगेश शिवनगेकर, महादेव बा. शिवनगेकर, रामचंद्र शिवनगेकर, रवळनाथ शिदे, सुनिल  शिवनगेकर, सुनिता शिदे, शोभा नावलगी, विठ्ठल बामणे, विनायक शिवनगेकर, धुळाप्पा सरशेटी, विशाल संकपाळ, लक्ष्मण शिवनगेकर, सागर जाधव, मलाप्पा जाधव, मारूती संकपाळ, नारायण बामणे, गणेश शिदे, जयवंत शिरगावकर, विजय शिवनगेकर, स्वराज गडकरी, परशराम शिवनगेकर, जगदीश शिवनगेकर, अभिषेक शिवनगेकर, प्रदीप शिवनगेकर, दीपक शिवनगेकर, परशराम गडकरी आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment