डॉ. राजेश घोरपडे |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. राजेश घोरपडे यांची चंदगड विभागीय समन्वयकपदी शिवाजी विद्यापीठाकडून नियुक्ती झाली.
तसेच गडहिंग्लज विभागाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. डॉ. घोरपडे गेली दोन वर्षे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक म्हणून कार्यरत असून रक्तदान, वृक्षारोपण, कोरोना काळातील सर्वांगीण मदत, जलव्यवस्थापन, निर्माल्य संकलन, पुरग्रस्तांना मदत व पुरग्रस्त गावातील स्वच्छता, प्रबोधनात्मक व्याख्याने, कोरोना संबंधी वेबिनारचे आयोजन, माझे गाव कोरोना मुक्त गाव अभियान अशा विविध उपक्रमातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून भरपूर कामकाज झालेले. त्याची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठाने चंदगड विभागीय समन्वयक पदी नियुक्ती केली आहे. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य पी. ए . पाटील, डॉ. अनिल गवळी यांचेसह दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment