महागाव येथील संत गजानन फार्मसीत अनोख्या पद्धतीने मैत्री दिवस साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2021

महागाव येथील संत गजानन फार्मसीत अनोख्या पद्धतीने मैत्री दिवस साजरा


महागाव / सी. एल. वृत्तसेवा

      महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज फार्मसी महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या दारात वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने मैत्री दिवस साजरा केला.

        कोरोना च्या पार्श्वभूमीवर गेली कित्येक महिने विद्यार्थ्यांचे शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. मैत्री दिनाचे औचित्य साधून वर्गशिक्षक डॉ. रवींद्र कुंभार यांच्या संकल्पनेतून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या दारी वृक्षारोपण करून मैत्री दिवस साजरा करण्याचा संकल्प केला यासाठी विद्यार्थ्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास ७० हून अधिक वेगळ्या प्रकारचे रोपे लावून ते जतन करण्याची जबाबदारी घेतली. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी प्राचार्य डॉ. एस. जी. किल्लेदार यांचे मार्गदर्शन मिळाले.
No comments:

Post a Comment