महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०२१ कोणते निकष आहे, पात्रता काय आहे, वाचा सविस्तर......... - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2021

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०२१ कोणते निकष आहे, पात्रता काय आहे, वाचा सविस्तर.........

              महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०२१ ला अर्ज भरण्याला प्रारंभ झाला आहे. यासाठी कोणते निकष आहेत. पात्रता काय आहे. याविषयी सविस्तर माहीती खालीलप्रमाणे दिली आहे........


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०२१ चे वेळापत्रक

अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी

ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ०३/०८/२०२१ ते २५/०८/२०२१ वेळ २३:५९ वाजेपर्यंत

प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. २५/०९/२०२१ ते १०/१०/२०२१

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - I दिनांक व वेळ १०/१०/२०२१ वेळ स. १०:३० ते दु १३:००

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - II दिनांक व वेळ १०/१०/२०२१ वेळ दु. १४:०० ते सायं. १६:३०


प्रवाह तक्ता

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२१

ऑनलाईन अर्ज भरण्याचा कृती ओघ तक्ता (Flow Chart)

१) www.mahatet.in संकेतस्थळावर भेट देणे.

२) संकेतस्थळावरील MAHATET परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती, शासन निर्णय व परिपत्रके, परीक्षेचा आराखडा व अभ्यासक्रम, वेळापत्रक, परीक्षेस प्रविष्ट होण्याच्या अटी व शर्ती, आवश्यक प्रमाणपत्रे, परीक्षा शुल्क व इतर माहितीचे बारकाईने वाचन करावे.

३) सर्व माहितीचे अवलोकन केल्यानंतरच होमपेज वरील “नवीन नोंदणी” या बटनावर क्लिक करा.

४) नोंदणी विषयी सूचना काळजीपूर्वक वाचून सूचनांच्या तळाशी असलेले चेकबॉक्स (Checkbox ) वर क्लिक केल्यानंतरच “नवीन नोंदणी” या बटनावर क्लिक करा.

५) उघडलेल्या ऑनलाईन नोंदणी अर्जात दर्शवलेली माहिती प्रथम नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्म दिनांक (एस.एस. सी. प्रमाणपत्राप्रमाणे), मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी अचूकपणे भरा.

६) नोंदणी अर्जात नमूद केलेल्या ई-मेल व मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या SMS मधील TET Resgistration ID व Password द्वारे Login करा.

७) उघडलेल्या ऑनलाईन अर्जात दर्शविलेली माहिती अचूकपणे भरा, तसेच आपला नवीनतम फोटो आणि स्वाक्षरीची इमेज अपलोड करा. माहिती अचूकपणे भरल्यानंतर "Save & Preview" या बटनावर क्लीक करा.

८) स्क्रीनवर आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा

९) Preview मध्ये काही बदल करावयाचा असल्यास Edit बटणाचा वापर करून बदल करू शकता. भरलेल्या माहितीची खात्री झाल्यास सबमिट (Save and Preview) या बटनावर क्लिक करा. (शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्रामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.)

१०) PAYMENT च्या पेज वर गेल्यानंतर Confirm and Pay या बटणाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट/ डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरता येणार नाही.)

११) शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट विहित मुदतीत घेऊन अर्जदाराने जतन करून ठेवावी त्याकरिता Preview / Print या टॅब चा वापर करावा. तसेच Transaction History या टॅब वर क्लिक करून झालेल्या Transaction ची माहिती पाहता येइल.

१२) आवेदनपत्राची एक प्रत तुमच्या माहितीसाठी स्वतःजवळ जतन करून ठेवावी.


आराखडा

“शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) मध्ये प्राथमिक (इ. १ ली ते ५ वी) व उच्च प्राथमिक (इ.६ वी ते ८ वी) या दोन स्तरातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील. दोन्ही स्तरासाठी अर्ज करणा-या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका अनिवार्य असतील .

या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारीत राहील.


पात्रता गुण

या परीक्षेमध्य़े किमान ६० टक्के गुण प्राप्त करणा-या उमेदवारास (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती / भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि अपंग उमेदवारांना ५५ टक्के) पात्र समजण्यात येईल.


महत्त्व

“बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९” मधील तरतूदीनुसार यापुढे सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता (इ. १ ली ते ८ वी) “शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) अनिवार्य करण्यात येत आहे. ही बाब प्राथमिक शिक्षण (इ. १ ली ते ८ वी) देणा-या सर्व शाळांमध्ये (सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम, सर्व परीक्षा मंडळे, अनुदानित / विना अनुदानित / कायम विना अनुदानित इ.) सर्व शिक्षकांना लागू राहील.


वारंवारता आणि वैधता

“शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) दरवर्षी आवश्यकतेप्रमाणे (किमान एकदा) शासनामार्फत घेण्यात येईल.

उत्तीर्ण उमेदवारांना शासनातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रमाणपत्राची वैधता निर्गमित केलेल्या दिनांकापासून आजीवन राहील.

शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्ता पातळीत वाढ करण्यासाठी सदर परीक्षेस कितीही वेळा प्रविष्ट होता येईल.

शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण होणा-या उमेदवाराला थेटपणे नोकरी मिळणार नाही किंवा नोकरीसाठी त्यांचा कोणताही हक्क राहणार नाही.


कार्यपध्दती

“शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) शासनातर्फे किंवा शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकरण / संस्थाद्वारे घेण्यात येईल. ह्या परीक्षेचा खर्च भागविण्यासाठी प्राधिकरण / संस्थाना योग्य ती फी आकारण्याची मुभा राहील.

“शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) आयोजन करण्याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावर सोपविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी सर्व बाबींचा विचार करुन परीक्षा घेण्याचे व्यवस्थित नियोजन करावे यामध्ये उमेदवाराकडून अर्ज स्विकारण्यापासून मुलांना पात्रता प्रमाणपत्र देण्याच्या सर्व बाबींचा (उदा:- ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तयार करणे, केंद्रावर परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका OMR पध्दतीने तपासणी करणे, ऑनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करणे, उत्तीर्ण उमेदवारांना विशिष्ट (युनिक) नोंदणी क्रमांक देणे इत्यादी ) अंतर्भाव असेल. परीक्षा परिषदेने शक्यतो सर्व बाबीकरिता संगणकीय पध्दतीचा वापर करावा.

प्रश्नपत्रिका आराखडा व स्वरूप

प्रश्नपत्रिका आराखडा व स्वरूप

शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.

·         प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. १ ली ते इ. ५ वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी

·         उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. ६ वी ते इ. ८ वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी

·         प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी प्राथमिक स्तर)

एकूण गुण १५०

कालावधी-२ तास ३० मिनिटे

अ.क्र.

विषय (सर्व विषय अनिवार्य)

गुण

प्रश्न संख्या

प्रश्न स्वरुप

बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र

३०

३०

बहुपर्यायी

भाषा-१

३०

३०

बहुपर्यायी

भाषा-२

३०

३०

बहुपर्यायी

गणित

३०

३०

बहुपर्यायी

परिसर अभ्यास

३०

३०

बहुपर्यायी

एकूण

१५०

१५०

 

पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी)

अ. क्र.

माध्यम

पेपर सांकेतांक

विभाग १

विभाग २

विभाग ३

विभाग ४

विभाग ५

भाषा (३० गुण)

भाषा (३० गुण)

बालमानसशास्र व अध्यापनशास्र (३० गुण)

गणित (३० गुण)

परिसर अभ्यास (३० गुण)

प्रश्न क्र.१ ते ३०

प्रश्न क्र.३१ ते ६०

प्रश्न क्र.६१ ते ९०

प्रश्न क्र.९१ ते १२०

प्रश्न क्र.१२१ ते १५०

मराठी

१०१

इंग्रजी

मराठी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

इंग्रजी

२०१

इंग्रजी

मराठी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

उर्दु

३०१

इंग्रजी किंवा मराठी

उर्दु

उर्दु व इंग्रजी

उर्दु व इंग्रजी

उर्दु व इंग्रजी

हिंदी

४०१

इंग्रजी किंवा मराठी

हिंदी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

बंगाली

५०१

इंग्रजी किंवा मराठी

बंगाली

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

कन्नड

६०१

इंग्रजी किंवा मराठी

कन्नड

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

तेलुगु

७०१

इंग्रजी किंवा मराठी

तेलुगु

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

गुजराती

८०१

इंग्रजी किंवा मराठी

गुजराती

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

सिंधी

९०१

इंग्रजी किंवा मराठी

सिंधी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी


पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी उच्च प्राथमिक स्तर)

एकूण गुण १५०

कालावधी-२ तास ३० मिनिटे

अ.क्र.

विषय (सर्व विषय अनिवार्य)

गुण

प्रश्न संख्या

प्रश्न स्वरुप

बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र

३०

३०

बहुपर्यायी

भाषा-१

३०

३०

बहुपर्यायी

भाषा-२

३०

३०

बहुपर्यायी

अ) गणित व विज्ञान
        
किंवा
ब) सामाजिक शास्त्रे

६०

६०

बहुपर्यायी

एकूण

१५०

१५०

 

पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी)

अ. क्र.

माध्यम

पेपर सांकेतांक

विभाग १

विभाग २

विभाग ३

विभाग ४

भाषा (३० गुण)

भाषा (३० गुण)

बालमानसशास्र व अध्यापनशास्र (३० गुण)

गणित व विज्ञान (६० गुण)

सामाजिक शास्र (६० गुण)

प्रश्न क्र.१ ते ३०

प्रश्न क्र.३१ ते ६०

प्रश्न क्र.६१ ते ९०

प्रश्न क्र.९१ ते १५०

प्रश्न क्र.९१ ते १५०

मराठी

१०२

इंग्रजी

मराठी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

इंग्रजी

२०२

इंग्रजी

मराठी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

उर्दु

३०२

इंग्रजी किंवा मराठी

उर्दु

उर्दु व इंग्रजी

उर्दु व इंग्रजी

उर्दु व इंग्रजी

हिंदी

४०२

इंग्रजी किंवा मराठी

हिंदी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

बंगाली

५०२

इंग्रजी किंवा मराठी

बंगाली

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

कन्नड

६०२

इंग्रजी किंवा मराठी

कन्नड

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

तेलुगु

७०२

इंग्रजी किंवा मराठी

तेलुगु

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

गुजराती

८०२

इंग्रजी किंवा मराठी

गुजराती

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

सिंधी

९०२

इंग्रजी किंवा मराठी

सिंधी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी


पेपर II मधील अ.क्र १ ते ३ विषय अनिवार्य आहेत. गणित व विज्ञान शिक्षकांसाठी विषय ४ मधील आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी विषय ४ मधील व इतर शिक्षकांसाठी विषय क्र ४ मधील किंवा पैकी कोणताही एक विषय निवडता येईल.

 


महाटीईटी प्रमाणपत्र

पात्रता परीक्षेतील संपादणुकीनुसार शासनमान्य निकषाप्रमाणे उत्तीर्ण परीक्षार्थीस पात्रता प्रमाणपत्र दिले जाईल..


संपर्क

पत्ता :

आयुक्त,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,

१७, डॉ. आंबेडकर मार्ग,

पुणे - ४११ ००१

हेल्पलाईन नंबर :

8956438464/65/66/67/68/

69/70/71/72/73

8956470891

/92/93/94/95/96

ई-मेल: mahatet2021.msce@gmail.com

-----------------------------------------------------------------------------------

                जाहिरात                                            जाहिरात 

टीईटी परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संपर्क करा.

श्री साई कॉम्प्युटर्स, बँक ऑफ इंडिया शेजारी, पहिला मजला चंदगड. संपर्क 02320224245, मो. 9604411225.

-----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment