तडशिनहाळच्या त्या कुटुंबियाला वर्ग मित्रांची मदत, दीड लाखांची विमा पॉलिसी, पाच हजार रुपये ठेव, अँड्रॉइड मोबाइल भेट - चंदगड लाईव्ह न्युज

20 August 2021

तडशिनहाळच्या त्या कुटुंबियाला वर्ग मित्रांची मदत, दीड लाखांची विमा पॉलिसी, पाच हजार रुपये ठेव, अँड्रॉइड मोबाइल भेट

कांबळे कुटुंबियांना मदत देताना वर्गमित्र.


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

             तडशिनहाळ (ता. चंदगड) येथील मोहन कांबळे हा वर्गमित्र या जगातून अचानक सोडून गेल्याने त्याच्या अडचणीत आलेल्या कुटुंबीयासाठी २००३ सालच्या तूर्केवाडी हायस्कूलच्या दहावी बॅच मधील वर्गमित्र पुढे सरसावले. दीड लाख रुपयांची विमा पॉलिसी पाच हजार रुपयांची ठेव व ऑनलाईन शिक्षणासाठी म्हणून अँड्रॉइड मोबाईल भेट म्हणून देण्यात आला. 15 ऑगस्ट निमित्ताने प्राथमिक विद्यामंदिर मध्ये झालेल्या कार्यक्रमात सदर मदत करण्यात आली. 

 यावेळी तडशीनहाळ, माडवळे, वैतागवाडी, तुर्केवाडी या गावातील वर्गमित्र उपस्थित होते. मुख्याध्यापक तानाजी नाईक यांनी प्रास्ताविक करून उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला. प्रास्ताविक गोविंद चांदेकर यांनी केले.

           मोहन यांच्या पश्च्यात आई वडील,पत्नी, दोन मुली आहेत. सदर दुर्देवी घटना समजताच कधी काळी आपल्या सोबत खेळणारा आणि एकाच डब्यातील भाकरी वाटून खाणारा आपला सवंगडी मोहन कांबळे यांच्या अचानक जाण्याने सारा मित्र परिवार हळहळला. वर्ग-मित्रांनी आपण हि त्यांच्या कुटूंबासाठी काही तरी छोटीसी मदत  करावी, या भावनेतून आपल्या वर्गमित्रांच्या मस्ती की पाठशाळा या व्हाट्सअप ग्रुपवर आवाहन करून निधी संकलन केला. आपले शहरात नोकरी करणारे मित्र, सैनिक मित्र,स्थानिक मित्र, मैत्रीणीनी ही आपली मदत पाठविली.

           मोहन यांची पत्नी मिनाक्षी कांबळे व मुलगी प्रियांका व सानिया यांच्याकडे सुपूर्त केली. मुलींना ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल संच, लहान मुलीच्या नावे ठेव पावती, दोन्ही मुलींना वर्ष भराचे शालेयपयोगी साहित्य, पत्नी करिता १,५०,०००/- विमासंरक्षण असणारी अपघात विमा पोलिसी सुपूर्द केली. व्यासपीठावर  निवृत्त मुख्याध्यापक यलाप्पा पाटील, तंटामुक्त सदस्य नारायण दळवी, माजी सैनिक महादेव बोलके, डी. जे. पाटील, अध्यापिका किर्ती पाटील व ग्रामस्थ विद्यार्थी होते.                       

           कोरोनामुळे  शाळा बंद  असल्याने सगळीकडे ऑनलाईन शिक्षण नाचे महत्व वाढले आहे. यामुळे प्रियांका व सानिया  कांबळे यांना १ मोबाईल संच प्रदान करण्यात आला. यांचा वर्षभराचा सर्व शैक्षणिक खर्च, वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, स्कूल बॅग आदी शालेयपयोगी वस्तू देण्यात आल्या. वर्ग मित्रांचे प्रतीनिधि म्हणून विद्या कदम, रविंद्र कोणेवाडकर, विनोद पाटील, दौलत पाटील, सागर चौगुले, महेश बस्सापुरे, नागराज कांबळे, सचिन सुतार, ज्ञानेश्वर दळवी उपस्थित होते. आभार विनोद पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment