मस्ती की पाठशाळा ग्रुपतर्फे तडशिनहाळच्या अनाथांना मदत - चंदगड लाईव्ह न्युज

20 August 2021

मस्ती की पाठशाळा ग्रुपतर्फे तडशिनहाळच्या अनाथांना मदत

अनाथांना मदत देताना मस्ती की पाठशाळा ग्रुपचे सदस्य

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

      तडशिनहाळ (ता. चंदगड) येथील कोरोनाने अनाथ झालेल्या यश व श्रेयस कांबळे यांना समाजाच्या भक्कम आधाराची गरज आहे. हे ओळखून मस्ती कि पाठशाळा या तुर्केवाडीच्या माजी विद्यार्थी ग्रुपने तडशीनहाळ येथे जाऊन त्यांना गृहपयोगी वस्तू, अन्नधान्य व वर्षभराचे शालेय शिक्षणाचे साहित्य दिले.यावेळी ग्रुपचे प्रतिनिधी रवींद्र कोनेवाडकर, विनोद पाटील, सागर चौगुले, दौलत पाटील, महेश बस्सापुरे, सचिन सुतार, नागराज कांबळे, नारायण दळवी उपस्थित होते.

           विनोद पाटील म्हणाले, कोरोनाने मातृ-पितृ छत्र हरवल्याने दोन बालके पोरकी झाली. त्यांना समाजाने जगण्यासाठी सर्वार्थाने मदत करण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment