नेसरी शिवसेनेकडून बैलगाडा शर्यत चालू करण्यासंदर्भात निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

15 August 2021

नेसरी शिवसेनेकडून बैलगाडा शर्यत चालू करण्यासंदर्भात निवेदन

 

बैलगाडा शर्यत चालू करण्यासंदर्भात नेसरी शिवसेना शाखेच्या वतीने विजय देवणे  व सतीश नरसिंग यांना निवेदन देताना प्रकाश मुरकुटे व शिवसैनिक

नेसरी -सी .एल. वृत्तसेवा

नेसरी ( ता. गडहिंग्लज ) येथे युवासेना चंदगड आजरा व गडहिंग्लज मुलाखती निमित्त आलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  विजय  देवणें व युवासेना विस्तारक कोल्हापूर  डॉ सतीश नरसिंग यांचे स्वागत नेसरी शिवसेने मार्फत करण्यात आले . तसेच नेसरी विभागातील बैलगाडा चालकमालक संघटना मार्फत बैलगाडा शर्यत चालू व्हावी यासाठी  विजय देवणे
 याना निवेदन देण्यात आले .
यावेळी  विलास भाई हल्याळी ( माजी उपतालुका प्रमुख गडहिंग्लज), प्रकाश शिवाजी मुरकुटे ( नेसरी शिवसेना शहर प्रमुख), भागेश पांडव, प्रमोद मुरकुटे, सौरभ गंगली, प्रशांत मुरकुटे, दिगंबर तेजम, आकाश हल्याळी, श्रीहरी भोपळे, सचिन नाईक,अक्षय डवरी, कैफ दड्डीकर, उपस्थित होते.





No comments:

Post a Comment