चंदगड तहसील मधील चार कर्मचारी आदर्श पुरस्काराने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2021

चंदगड तहसील मधील चार कर्मचारी आदर्श पुरस्काराने सन्मानित

गडहिंग्लज येथे स्वातंत्र्यदिनी महसूल विभागाचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार आम.राजेश पाटील यांच्या हस्ते स्विकारताना प्र.नायब तहसीलदार संजय राजगोळे,बाजुला प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे.

चंदगड / प्रतिनिधी (नंदकुमार ढेरे) 

          चंदगड तहसील कार्यालयांतर्गत महसूल विभागातील चार कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.प्रभारी नायब तहसीलदार संजय राजगोळे,मंडल अधिकारी प्रविण खरात( हेरे),तलाठी दीपक कांबळे (कोवाड),कोतवाल सोमनाथ शहापूरकर (शिनोळी) याना आम.राजेश पाटील, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी गडहिंग्लजचे तहसीलदार दिनेश पारगे,शरद मगर उपस्थित होते.

गडहिंग्लज येथे स्वातंत्र्यदिनी महसूल विभागाचा उत्कृष्ट कोतवाल पुरस्कार प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्याहस्ते स्विकारताना सोमनाथ शहापूरकर,बाजूला तहसीलदार दिनेश पारगे.शरद मगर आदी.

           नागरिकांच्या दैनंदिन जीवनात महसूल विभागाचे अनन्य असे महत्त्व आहे.१ऑगस्ट या महसुल दिनी चंदगड तहसील मधील चार कर्मचाऱ्यांची  निवड करण्यात आली होती.स्वातंत्र्यदिनी या चौघांना गडहिंग्लज येथे आदर्श  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

गडहिंग्लज येथे स्वातंत्र्यदिनी महसूल विभागाचा उत्कृष्ट तलाठी पुरस्कार आम.राजेश पाटील यांच्या हस्ते स्विकारताना तलाठी दीप कांबळे,बाजुला प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे.मगर

           कोविड प्रतिबंधक, कायदा व सुव्यवस्था, महापुर मदतकार्य, महसुली वसुली, निवडणुक तसेच दैनंदिन कामकाजामध्ये सन २०२०-ते २०२१ सालात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल व जनतेला तत्पर सेवा दिल्याबद्दल त्यांना 

गडहिंग्लज येथे स्वातंत्र्यदिनी महसूल विभागाचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार आम.राजेश पाटील यांच्या हस्ते स्विकारताना मंडलअधिकारी प्रविण खरात,बाजुला प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे.

         आज महसुल विभागाने प्रभारी नायब तहसीलदार संजय राजगोळे, मंडल अधिकारी प्रविण खरात याना आदर्श अधिकारी, दीपक कांबळे यांना आदर्श तलाठी व सोमनाथ शहापूरकर यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामूळे या चौघाचे चंदगड तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment