मलिग्रेत वीस वर्षे ध्वज बांधण्याची देशसेवा करणाऱ्या बस्त्याव बारदेस्कर यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2021

मलिग्रेत वीस वर्षे ध्वज बांधण्याची देशसेवा करणाऱ्या बस्त्याव बारदेस्कर यांचा सत्कार

बसत्याव बारदेस्कर यांचा सत्कार करताना संजय घाटगे. 

आजरा / सी. एल. वृत्तसेवा

             मलिग्रे (ता. आजरा) येथील महात्मा जोतीबा  फुले विद्या मंदिर मलिग्रे या प्राथमिक  शाळेचा ध्वजा रोहन कार्यक्रम मलिग्रे  ग्रामपंचायतीचे उप सरपंच राजाराम  नावलगी यांच्या  हस्ते संपन्न झाला. यावेळी शाळा व्यवस्थापन  कमिटीच्या वतीने 15 ऑगस्ट अमृत महोत्सव निमित्त  गेल्या विस वर्षापासून गावातील सर्व संस्थांचे राष्ट्रीय ध्वज बांधणीचे काम करून देशसेवेमध्ये सहभागी झालेल्या बस्त्याव बावतीस बार्देसकर  यांचा संजय घाटगे यांनी शाल श्रीफळ  देवून  सत्कार केला.

            श्री बार्देसकर यांनी मलिग्रे गावामध्ये गेली विस वर्षे श्री रवनाथ दुध संस्था , भावेश्वरी  पत संस्था , प्राथमिक शाळा , हायस्कूल व ग्राम पंचायत या ठिकानी विना मोबदला ध्वजा रोहना पुर्वी योग्य पध्दतीने ध्वज बांधण्याचे  काम करतात . 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या दिवशी सकाळीसकाळी  पत संस्था  दुध संस्था  हायस्कूल प्राथमिक शाळा  व ग्राम पंचायत या ठिकानी  जावून निर्पेक्ष भावनेने झेंडा बांधण्याचे व स्वतंत्र भारत मातेची सेवा करणेचे  त्यांचे कार्य  पाहून शाळा व्यवस्थापन कमिटीच्या वतीने सत्कार  करण्यात  आला.  यावेळी  सरपंच शारदा गुरव, पोलिस पाटील मोहन सावंत , माझी सरपंच समिर पारदे,  शाळा  समिती अध्यक्ष  शिवाजी  भगुत्रे, मुख्याध्यापिका  मनिषा  सुतार,  ग्राम पंचायत  सर्व सदस्य  विविध संस्थाचे पदाधिकारी  ग्रामस्थ हायस्कूल शिक्षक अंगणवाडी  सेविका  व विद्यार्थी  उपस्थित  होते. आभार  कल्पना  कोरवी  यांनी मानले.

No comments:

Post a Comment