संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या 124 विद्यार्थ्यांची 74 राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय नामवंत कंपनीत नोकरीसाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2021

संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या 124 विद्यार्थ्यांची 74 राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय नामवंत कंपनीत नोकरीसाठी निवड


चंदगड / प्रतिनिधी 

        महागाव  येथील संत गजानन महाराज शिक्षण संस्था संचलित संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या झालेल्या कॅम्पस मुलाखतीतून शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये 124 हुन अधिक विद्यार्थ्यांची 74 राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय अशा नामवंत कंपन्यांमध्ये विविध पदावर निवड झाल्याची माहिती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. संतोष गुरव यांनी दिली.

          येथील इंजिनिअरिंग महाविद्यालयातील सर्वाधिक वार्षिक वेतन रु.5 लाख वेतनावर स्वप्नील पोवार या विद्यार्थ्यांची सोपरा स्टेरिया, बंगलोर या कंपनीत निवड करण्यात आली येथील शैक्षणिक गुणवत्तेमुळे यशाची परंपरा कायम ठेवली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. अँड. आण्णासाहेब चव्हाण यांनी दिली. पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते. तीन स्तरावर झालेल्या या निवड प्रक्रियेत सुरवातीला ऍप्टिट्यूड, तांत्रिक मुलाखत व शेवटी एच. आर. राउंड झाला. ही सर्व प्रक्रिया राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन व ऑफलाईन स्वरुपात घेण्यात आली यामध्ये खालील कंपन्यांच्या सहयोगाने विविध शाखेच्या विद्यार्थ्यांची खालीलप्रमाणे निवड करण्यात आली.

        स्वप्नील पोवार सोपरा स्टेरिया, बंगलोर रु. ५ लाख वार्षिक वेतन प्रज्ञा बसरीकट्टी कॅपजेमिनी रु. ३ लाख वार्षिक वेतन श्रुतिका दोरुगडे कॅपजेमिनी रु.३ लाख वार्षिक वेतन वनश्री हिडदुगी कॅपजेमिनी रु.३ लाख वार्षिक वेतन पल्लवी कोडोली टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस रु.४ लाख वार्षिक वेतन शुभम गवस टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस रु.४ लाख वार्षिक वेतन तृप्ती सरोलकर प्रोवेन्टेक रु.३.५ लाख वार्षिक वेतन शर्वरी गुडुलकर अटॉस ग्लोबल रु. ३.५ लाख वार्षिक वेतन तरन्नम पठाण सुल्झर इंडिया रु.२. १६ लाख वार्षिक वेतन कुणाल भोयर ऍमेझॉन इंडिया रु.२.६० लाख वार्षिक वेतन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातर्फे सातत्याने प्रयत्न केले जातात. प्लेसमेंट विभागामार्फत दरवर्षी नवनवीन कंपन्यांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात येते. संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मध्ये अनेक मल्टि नॅशनल कंपनीच्या प्लेसमेंटसाठी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन करण्यात येत असते. कंपनी थेट संस्थेशी संपर्क साधून नोकरीची संधी उपलब्ध करून देत असल्याने याचा फायदा गरजू विद्यार्थ्यांना होत आहे. यापुढेही अधिकाधिक नोकऱ्या विध्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सावंत व प्लेसमेंट ऑफिसर यांनी सांगितले.

          विद्यार्थ्यांचे निवडीमुळे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अँड. आण्णासाहेब चव्हाण, विश्वस्थ डॉ. यशवंत चव्हाण, विश्वस्थ डॉ. संजय चव्हाण, सचिव अँड. बाळासाहेब चव्हाण, रजिस्ट्रार श्री शिरीष गणाचार्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सावंत, प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. संतोष गुरव व कॉलेज चे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. महादेव बंदी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व विभागप्रमुख प्रा. सचिन मातले, डॉ. अमोल माने, प्रा. अमर फराकटे, प्रा. शिवलिंग स्वामी, प्रा. मल्लिकार्जुन पाटील, प्रा. विनायक घाटगे, प्रा. सचिन सनदी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.



No comments:

Post a Comment