माजी खासदार राजू शेट्टी यांचा बुधवार १८ रोजी कोवाड दौरा, पुरग्रस्थ भागाची करणार पहाणी - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2021

माजी खासदार राजू शेट्टी यांचा बुधवार १८ रोजी कोवाड दौरा, पुरग्रस्थ भागाची करणार पहाणी

खासदार राजू शेट्टी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यात गेल्या महिन्यामध्ये अतिवृष्टीमूळे  ताम्रपर्णी नदीकाठच्या शेतकऱ्यांचे व कोवाड व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करून पूरग्रस्त शेतकरी व व्यापारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी बुधवारी (दि.18 रोजी सकाळी 11वा.) विठ्ठल मंदिर कोवाड येथे उपस्थित राहणार आहेत. पूरग्रस्तांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या प्रत्यक्ष मांडाव्यात असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांनी केले आहे.
No comments:

Post a Comment