हेल्पिंग हँड्स युथ सर्कल च्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2021

हेल्पिंग हँड्स युथ सर्कल च्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप

हेल्पिंग हँड्स युथ सर्कल च्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप करताना मान्यवर. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          हेल्पिंग हँड्स युथ सर्कल या सामाजिक संस्थेकडून महात्मा फुले हायस्कूल बटकणंगले येथे शिकत असलेल्या सानिका संतोष पाटील, साहिल संतोष पाटील,वैष्णवी भरमु नाईक, श्रावणी भरमु नाईक अशा चार अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले व त्यांची दहावीपर्यंतची शैक्षणिक जबाबदारी स्वीकारण्यात आली तसेच बटकणंगले व चन्नेकुपी या गावातील 11 निराधार वृद्ध व्यक्तींना विलास मटकर,मारुती आंबुलकर, अमृत मटकर, अण्णा सावंत या माजी सैनिकांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू देऊन निराधार लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

           यावेळी सदस्य विकास येलकर, प्रदीप कुंभार, विनायक पाटील, कुंदन गुरव, रुपेश देसाई, अनंत पाटील, सतीश पाटील, विलास सावंत, भावेश निकम, राजेश पाटील, सौरभ पाटील  व मार्गदर्शक संदीप अर्दाळकर उपस्थित होते.No comments:

Post a Comment