शिक्षक बँक सभासदांचे हित जोपासत सुख-दुःखात सभासदांच्या व कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार - आण्णासो शिरगावे - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2021

शिक्षक बँक सभासदांचे हित जोपासत सुख-दुःखात सभासदांच्या व कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार - आण्णासो शिरगावे

कोरोनामुळे मयत झालेले सभासद कै राजेंद्र नारायण तुपे यांच्या पत्नी श्रीमती भाग्यलक्ष्मी राजेंद्र तुपे यांना चेअरमन आण्णासो शिरगावे  यांच्या हस्ते शिक्षक बँकेमार्फत पाच लाख रुपयेचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी व्हाईस चेअरमन, संचालक शिवाजी पाटील, एम. टी. कांबळे व संचालक मंडळ

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          जास्तीत जास्त सभासदांनी शिक्षक बँकेकडे कर्ज घ्यावे, बँकेमार्फत पगारदार खातेदारांना चाळीस लाखाचे अपघाती विमा संरक्षण असल्याने पगार बँकेतून घेऊन, तसेच ठेव ठेवून सहकार्य करावे, डीसीपीएस धारकांच्या व सभासदांच्या पाठीशी बँक खंबीरपणे यापुढेही उभे राहील अशी ग्वाही चेअरमन शिरगावे यांनी दिली.

      हलकर्णी (ता. चंदगड) येथे प्राथमिक शिक्षक बँक लिमिटेड कोल्हापूर यांच्यावतीने आज सेवेत असताना मयत झालेल्या सभासदांच्या कुटुंबीयांना मदतीचा धनादेश प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. 

           कोरोना काळात दिवंगत झालेल्या सर्व बँक परिवारातील सदस्यांना व कोरोना योद्धाना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संस्थापक राव डी आर भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन चेअरमन आण्णासो शिरगावे व उपस्थित मान्यवरांनी  केले

   प्रारंभी संचालक शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविक करून शिक्षक बँकेचा प्रगतीचा आढावा घेतला, शिक्षक बँक सभासदांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

      हलकर्णी शाखेकडील डीसीपीएस धारक मयत झालेले सभासद कै राजेंद्र नारायण तुपे यांच्या पत्नी श्रीमती भाग्यलक्ष्मी राजेंद्र तुपे यांना चेअरमन आण्णासो शिरगावे  यांच्या हस्ते शिक्षक बँकेमार्फत तात्काळ आर्थिक मदत म्हणून पाच लाख रुपयेचा धनादेश प्रदान केला याच बरोबर सभासद कै  विठोबा कृष्णा पाटील मयत झाल्याने तात्काळ मदत म्हणून त्यांच्या पत्नी श्रीमती लता पाटील यांना व्हाईस चेअरमन बाजीराव कांबळे यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला याचबरोबर त्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात आले

            यानंतर शिक्षक बँकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या फास्ट टॅग सुविधा मधील पहिला फास्ट टॅग बँकेचे सभासद भरमाणा मुरकुटे यांना माजी व्हाईस चेअरमन अरुण पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संचालक साहेब शेख, शिक्षण विस्तार अधिकारी एम टी कांबळे, शिक्षक संघ कार्याध्यक्ष शाहू पाटील, पदवीधर शिक्षक सभा अध्यक्ष अशोक नौकुडकर, शिक्षक  संघ जिल्हाध्यक्ष संभाजी बापट यांनी  शिक्षक बँकेला शिक्षक स़ंघाच्या नेतृत्वाखाली सक्षम बनविले आहे सर्व संचालक मंडळाच्या काटकसरीने केलेल्या पारदर्शक कारभारामुळे विक्रमी नफा झाला असल्याचे सांगितले.

नूतन चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल शिक्षक संघ परिवार चंदगड यांच्या वतीने आण्णासो शिरगावे यांचा सत्कार शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष रमेश हुद्दार यांच्या हस्ते करण्यात आला,तर व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल बाजीराव कांबळे यांचा सत्कार माजी चेअरमन वसंत जोशिलकर यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी उपस्थित  शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक संभाजी बापट, राजमोहन पाटील, साहेब शेख, दिलीप पाटील ,माजी व्हाईस चेअरमन अरुण पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी एम टी कांबळे , आजरा तालुका संघाचे अध्यक्ष मायकल फर्नांडिस याचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

          यावेळी जिल्हा उपाध्यक्ष टी जे पाटील ,पदवीधर संघटना सचिव अशोक भोईटे,श्री देव  वैजनाथ पतसंस्था व्हाईस चेअरमन अनंत मोटर व संचालक मंडळ तालुका डीसीपीएस संघटना कार्यकारिणी आनंदा कांबळे बाळाराम नाईक रमेश नाईक,शिक्षक संघ कार्यकारणी व  बहुसंख्य शिक्षक बँक सभासद डीसीपीएस धारक सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन सटूप्पा फडके यांनी केले तर आभार जिल्हाउपाध्यक्ष सदानंद पाटील यानी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाधिकारी वाय एस पाटील  व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment