ताम्रपर्णी नदीकाठी मगरीचा वावर, नागरीकांनी सावधगिरी बाळगण्याचे वनविभागाचे आवाहन, कोठे......वाचा सविस्तर........... - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2021

ताम्रपर्णी नदीकाठी मगरीचा वावर, नागरीकांनी सावधगिरी बाळगण्याचे वनविभागाचे आवाहन, कोठे......वाचा सविस्तर...........

धुमडेवाडी (ता. चंदगड) येथे ताम्रपर्णी नदीकाठावरील मगर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा  (नंदकुमार ढेरे)

           धुमडेवाडी (ता. चंदगड) येथे ताम्रपर्णी नदी काठी असलेल्या स्मशान भूमी जवळ (डोणाजवळ) गेल्या आठ दिवसांपासून मगरीचा वावर आहे. गेल्या आठ दिवसापासून मगर नदी पात्राच्या बाजूला दिसत असल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

     गावापासून एक किलोमीटर अंतरावर ताम्रपर्णी नदीचे पात्र असून नदी पात्राजवळच गावची स्मशानभूमी आहे.याठिकणी सकाळ, दुपार,संध्याकाळच्या वेळेत ही स्मशानभुमीजवळ चिखलात पडलेली शेतकर्याना दिसली.गेले आठ दिवस येथील शेतकऱ्यांना हि मगर निदर्शनास येत होती.आज सकाळी पोलिस पाटील मोहन पाटील, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, परशराम बागडी, परशराम दोड्डण्णावर आदीनी नदी काठी जाउन पहाणी केली असता मगरीने पाण्यात उडी मारली. दरम्यान मगरीची माहीती माजी सभापती शांताराम पाटील यानी वनविभागाला कळवताच पाटणे वनविभागामार्फत नदीकाठी गस्त घालून मगरीचा शोध घेतला. दरम्यान वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यानी चंदगड तालुक्यात आलेल्या महापूरात  ताम्रपर्णी नदीत, कर्नाटकातील अलमटी किंवा हिडकल धरणातून या मगरीने प्रवेश केल्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकानी नदी काठी, शेती कडे किंवा जनावरे घेऊन जाताना सावधगिरी बाळगावी, नदीपात्रात उतरू नये, मगरीचे पुन्हा दर्शन झाल्यास तात्काळ वनविभागामार्फत संपर्क साधावा असे आवाहन केले. 

No comments:

Post a Comment