गडी आम्ही चंदगडी ग्रुपतर्फे बेनकनहळी स्मशानभूमीत वृक्षारोपण - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2021

गडी आम्ही चंदगडी ग्रुपतर्फे बेनकनहळी स्मशानभूमीत वृक्षारोपण

बेनकनहळी : वृक्षारोपण प्रसंगी गडी आम्ही चंदगडी ग्रुपचे सदस्य.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

      बेळगाव येथील गडी आम्ही चंदगडी ग्रुपतर्फे बेनकनहळी (ता. बेळगाव) येथे स्मशानभूमीत दि. 15 रोजी स्वातंत्र्यदिनाचे

     औचित्य साधून कोरोनामुळे दिवंगत झालेला ग्रुपचा सदस्य विजय कांबळे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले. बकुळ, कडुलिंब पिंपळ, जांभूळ या प्रकारची झाडे लावण्यात आली. यावेळी गजानन सावंत, तुकाराम पवार यांनी मनोगत व्यक्त करून पर्यावरण रक्षणाबद्दल माहिती दिली. अभिजीत कोकितकर, प्रवीण पाटील, परशराम केसरकर, सदाशिव बापट, गौरांग भानुशाली, बबन भाटे, सतीश अष्टेकर, अरविंद पाटील, ज्ञानेश पाटील, तुकाराम पवार, संजय पाटील, राघवेंद्र टकले, राहुल सावंत, अंकुश पाटील, दत्ता मुंगुरवाडी, भारत पाटील, शांताराम अलगोंडी, जीतन पाटील, जोतिबा पारशी, संजय मासेकर, परशराम केसरकर, प्रवीण पाटील, ग्राम पंचायत सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment