आईच्या मृत्यूच्या धक्क्याने मुलाची आत्महत्या,कलिवडे येथील घटना - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2021

आईच्या मृत्यूच्या धक्क्याने मुलाची आत्महत्या,कलिवडे येथील घटना

 

सागर तुकाराम कांबळे

चंदगड / प्रतिनिधी

         कलिवडे ता.चंदगड येथील सागर तुकाराम कांबळे (वय वर्षे ३४) या युवकाने  ताम्रपर्णी नदीत उडी मारून आत्महत्या केली.आईच्या निधनाचा धक्का बसल्यान बेपत्ता मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  त्याचा मृतदेह शनिवारी (दि. १४ ऑगस्ट रोजी) दुपारी ढोलगरवाडी-कडलगे हद्दीतील ओढ्यात सापडला. यावरून त्याने माणगाव पुलावरून उडी मारून आत्महत्त्या केल्याचा संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदगड तालुक्यातील कलिवडे या गावच्या लक्ष्मी तुकाराम कांबळे यांचा ११ ऑगस्ट रोजी रात्री हृदय विकाराने  मृत्यू झाला.आईच्यानिधनाची बातमी ऐकताच  मुलगा सागर  याला मानसिक धक्का बसला. भेदरलेल्या स्थितीत तो माणगावमधून बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा शोध सुरू होता. अखेर शनिवारी  दुपारी ढोलगरवाडी-कडलगे येथील ओढ्यात त्याचा मृतदेह सापडला असून त्याने आईच्या जाण्याने मानसिक धक्क्यातून आत्महत्त्या केल्याचा संशय आहे. याबाबतची फिर्याद सरपंच अमृत कांबळे यानी चंदगड पोलिसात दिली होती.No comments:

Post a Comment