'कर्नाटक रेस चॅम्पियनशिप' मध्ये उपविजेता ठरला कालकुंद्रीचा धावपटू - चंदगड लाईव्ह न्युज

31 August 2021

'कर्नाटक रेस चॅम्पियनशिप' मध्ये उपविजेता ठरला कालकुंद्रीचा धावपटू

बागलकोट (कर्नाटक) येथील उपविजेते पदाच्या ट्रॉफी सह सुमित पाटील.


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          कालकुंद्री (ता. चंदगड) गावचा उदयोन्मुख धावपटू सुमित बंडू पाटील यांने जगद्याळ, ता. बागलकोट येथील निसर्ग स्पोर्ट्स क्लब आयोजित 'कर्नाटक ओपन रेस चॅम्पियनशिप' स्पर्धेत देदीप्यमान यश मिळवले.  स्पर्धेतील १४ वर्षे वयोगट विभागात दुसरा क्रमांक पटकावत उपविजेतेपदाचा चषक, प्रशस्तीपत्र व रोख बक्षीस मिळवले.

            सुमित हा कालकुंद्री येथील श्री सरस्वती विद्यालयात इयत्ता नववीचा विद्यार्थी आहे. त्याने या वर्षभरात करगणी ता. आटपाडी जि. सांगली येथे ३ किमी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत तृतीय क्रमांक, संघर्ष कला क्रीडा मंडळ तळेवाडी- वडरगे ता. गडहिंग्लज येथील २.५ किमी धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक, श्रीरंग कॉलनी बेळगाव आयोजित ३ किमी मॅराथॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला होता. वरील तिन्ही स्पर्धांत त्याने आपल्यापेक्षा मोठ्या खेळाडूंना मागे टाकत चमकदार कामगिरी केली. बागलकोट येथील यशाबद्दल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक जॉर्ज क्रूज (कालकुंद्री) यांनी कोल्हापूर येथून स्पोर्ट शूज, टी-शर्ट आदी पाठवून अभिनंदन केले. त्याला याकामी शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.

No comments:

Post a Comment