कोवाड ग्रामस्थांच्या सहकार्याने पाणंद रस्ते खुले करणार - तलाठी राजश्री पंचडी - चंदगड लाईव्ह न्युज

31 August 2021

कोवाड ग्रामस्थांच्या सहकार्याने पाणंद रस्ते खुले करणार - तलाठी राजश्री पंचडी

कोवाड (ता. चंदगड) येथे तलाठी राजश्री पंचडी यांचा सत्कार करताना सरपंच अनिता भोगण. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          कोवाड (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने गावचे जूने, अडी-अडचणीत असलेले पाणंद रस्ते खुले करणार असल्याचा निर्धार कोवाडच्या नूतन तलाठी राजश्री पचंडी यांनी व्यक्त केला. कोवाड ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच अनिता भोगण होत्या. 

         कोवाड सजात नव्याने गावकामगार तलाठी म्हणून रुजू झालेल्या राजश्री पचंडी यांचा सरपंच अनिता भोगण यांच्या उपस्थीत तलाठी कार्यालयात शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रा.प सदस्या रेश्मा वांद्रे, तंटामुक्त कमिटी सचिव एम एन पाटील, माजी उपसरपंच मारुती भोगण, लक्ष्मण धर्मोजी, विक्रम पेडणेकर, रामा वांद्रे, राजू वांद्रे, जयवंत कांबळे, माजी सैनिक शिवाजी कुट्रे व ग्रामस्थ उपस्थीत होते.प्रास्तविक रणजित भातकांडे यांनी केले. तर आभार एम. एन पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment