शिनोळी ते सडेगुडवळे रस्त्या बांधकाम विभागाने दुरूस्त करण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

31 August 2021

शिनोळी ते सडेगुडवळे रस्त्या बांधकाम विभागाने दुरूस्त करण्याची मागणी

बेळगाव-वेगुर्ला रस्त्यावर वाली पेट्रोल पंपनजीक रस्त्यावर पडलेले खड्डे.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        बेळगाव - वेंगर्ले राजमार्गवर  शिनोळी ते सडेगुडवळे फाटा पर्यंतच्या रस्त्यात ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले असून वहानधारकाना प्रवास करणे अवघड झाले आहे. परिणामी अपघाताना निमंत्रण मिळत आहे, त्यामुळे सार्वजनीक बांधकाम  विभागाने तात्काळ  रस्त्यातील खड्डे भरून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी प्रवाशीवर्गातून होत आहे. चंदगड तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत पडलेल्या मुसळधार पावसाने बेळगाव - वेंगुर्ले रस्त्याच्या बाजुपट्टीतील काही भाग तुटून गेला आहे. त्यामुळे रस्ता उंच व साईडपट्टी सखल झाल्यामुळे वाहने बाजूला घेताना चालकाला मोठी कसरत करावी लागत आहे. 

         शिनोळी तुर्केवाडी फाटा यशवंतनगर, कार्वे, नरेवाडी, दाटे, कुर्तनवाडी, नागनवाडी, कानूर ते सडेगुडवळे पर्यंतच्या रस्त्यात पडलेल्या खड्डयामुळे दगड व चिपिंग उधळून रस्त्यावर अस्ताव्यस्त पडली आहे. त्यामुळे लहानमोठे अपघातहोत आहेत.आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने बेळगाव - वेंगुर्ला रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेऊन संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी होत आहे.



No comments:

Post a Comment