![]() |
ठाणे महापालिकेच्या आयुक्त माराहाण प्रकरणी आरोपीवर कडक कारवाई करावी या माणीचे निवेदन तहसीलदार विनोद रणवरे याना देताना चंदगड नगरपंचायतीचे कर्मचारी |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
ठाणे महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर माजीवाढा प्रभागामध्ये अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यावर कारवाई करत असताना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे हातगाडी फेरीवाले अमरजित यादव यांनी तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करून दोघांनाही गंभीर दुखापत केली आहे. या गुन्हेगारी वृत्तीचा चंदगड नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून व लेखणी थांबवून निषेध केला. गुन्हेगारी वृत्तीच्या या व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार विनोद रणावरे व नगराध्यक्षा सौ प्राची दयानंद काणेकर याना देण्यात आले.
![]() |
ठाणे महापालिकेच्या आयुक्त माराहाण प्रकरणी आरोपीवर कडक कारवाई करावी या माणीचे निवेदन नगराध्यक्षा सौ प्राची काणेकर याना देताना चंदगड नगरपंचायतीचे कर्मचारी |
एका महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही बाब अत्यंत चिंताजनक असून या बाबीचा सर्व स्तरावरून निषेध होणे आवश्यक आहे. शासनाचे कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठीचे बदल्यांचे चक्राकार धोरण पती - पत्नी एकत्रित करणाला नवीन धोरणात दिलेला फाटा व अशाप्रकारे होणारे जीव घेणे हल्ले, यामुळे महिला अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल याचा सुद्धा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही संघटनेच्या मान्यतेने चंदगड नगरपंचायतच्या वतीने या गुन्हेगारी कृत्याचा जाहीर निषेध करीत आहोत. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावत असताना अधिकाऱ्यांवर हल्ले करतात तेव्हा अशाप्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशाप्रकारच्या हल्ल्याचा संघटीत निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच याच्यावर उपाय आहे. प्रस्तुत प्रकरणी अटक केलेल्या गुन्हेगारावर शिग्र गतीने खटला चालवून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासना कडून विशेष प्रयत्न व्हावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment