संत गजानन महाराज शिक्षण समुहाचा अनोखा उपक्रम: “शिक्षण आपल्या दारी" - चंदगड लाईव्ह न्युज

31 August 2021

संत गजानन महाराज शिक्षण समुहाचा अनोखा उपक्रम: “शिक्षण आपल्या दारी"

 


चंदगड / प्रतिनिधी :
गतवर्षीपासुन शाळा महाविद्यालये बंद आहेत त्याचबरोबर प्रवासाची सोय सुद्धा कमी असल्याने गावाकडील अनेक विद्यार्थी व पालकांना नवीन येणा-या शैक्षीणीक वर्षाच्या (2021-22) प्रवेशासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पालकांना व विदयार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन संत गजानन महाराज शिक्षण समुहाचे अध्यक्ष अॅड. आण्णासाहेब चव्हाण व विश्वस्थ मंडळाने 'शिक्षण आपल्या दारी' या अभियानाचे धोरण नेमले आहे. या अभियाना अंतगर्त येणा-या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाची माहिती मिळावी म्हणून चंद्रगड, गडहिंग्लज व आजरा अश्या विविध तालुक्यांमध्ये समुपदेशन कक्षाची स्थापना केलेली आहे. जेणेकरून कोरोनाच्या महामारी काळामध्ये प्रवास करून शहरापर्यंत येण्याची गरज नाही तसेच एकत्र होणारी गर्दीसुद्धा टाळता येईल KG to PG पर्यंतच्या सर्वच म्हणजे अभियांत्रिकी, औषधनिर्माण, पदविका अभियांत्रिकी, आयुर्वेदिक मेडिसीन अॅण्ड सर्जरी, नर्सिंग, पॅरामेडिकल, डी. एड., हॉटेल व्यवस्थापन, अनिमेशन आणि ग्राफिक्स अशा विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी परिपूर्ण माहिती या समुपदेशन कक्षामध्ये मिळेल.

यासाठी सर्कर कॉम्प्युटर कोवाड, संभाजी चौक चंदगड, गजरे बिल्डींग आजरा व किरण हाइट्स ला मजला संजीवनी हॉस्पीटल जवळ गडहिंग्लज आणी ए.व्ही सॉफ्ट कॉम्प्युटर्स, उत्तुर अशा वेगवेगळ्या ठिकाणी एम. जी एम समुद्रेशन कक्षाची स्थापना केली असून तज्ञ शिक्षकांची समुपदेशक म्हणून नियुक्त्याही केलेल्या आहेत. जेणेकरून येणा-या शैक्षणिक वर्षामध्ये गरजू आणि होतकरू विद्यार्थी माहिती अभावी प्रवेशावाचुन वंचित राहणार नाही आणि ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा उच्च विभुषीत शिक्षण प्राप्त करतील बरील समुपदेशन कक्षामध्ये विनामूल्य माहिती दिली जात असून विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या नजीकच्या समुद्रेशन कार्यालयाशी संपर्क साधुन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करावा असे आवाहन संत गजानन महाराज शिक्षण समुहाचे विश्वस्थ डॉ. संजय चव्हाण यांनी केले प्रा. अमर फरावटे, प्रा. स्वप्निल कलस प्रा. मोसीन मुल्ला प्रा. संतोष पवार, प्रा. कुणाल राजदीप, प्रा. संभाजी गावडे, प्रा. महेश भांदिगरे, प्रा. दिग्विजय पोवार, प्रा. बाबासाहेब रेपे, प्रा. उदय पाटील, प्रा. सचिन मातले, प्रा. अतुल देशपांडे, व प्रा. मंजुनाथ पाटील, हे सर्व समुपदेशक म्हणून काम पहातील अशी माहिती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सावंत यांनी दिली.

उत्तुर येथे चालु केलेल्या संत गजानन महाराज (महागांव) शिक्षण समूहाच्या समुपदेशन ऑफीसला उत्तर सरपंच सौ. वैशालीताई आपटे यांनी सदिच्छा भेट दिली या प्रसंगी पुष्पगुच्छ देऊन प्रा. अतुल देशपांडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी प्रवेश प्रक्रीयेसंबंधी माहिती घेतली व संत गजानन महाराज शिक्षण समुहाच्या या अनोख्या कामाबद्दल व योगदानचे कौतुक केले लवकरच संत गजानन महाराज शिक्षण समुहाला भेट देण्याची त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली. विद्यार्थ्याच्या सोयी-सुविधाबद्दल समाधान व्यक्त केले या प्रसंगी अविसॉफ्ट कम्प्युटरचे सचिन कांबळे, राहुल पराळे व विद्यार्थी तसेच ओंकार आपटे उपस्थित होते.



No comments:

Post a Comment