राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या चंदगड तालुकाध्यक्षपदी निखिल बांदिवडेकर यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

03 August 2021

राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या चंदगड तालुकाध्यक्षपदी निखिल बांदिवडेकर यांची निवड

निखिल बांदिवडेकर

माणगाव / सी. एल. वृत्तसेवा

      राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनच्या चंदगड तालुका अध्यक्षपदी निखिल बांदिवडेकर यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष निहाल कुलावंत यांच्या सहीने देण्यात आले आहे. 

निवडीनंतर सत्कार करताना मान्यवर.

       निखिल बांदिवडेकर हे नागणवाडी येथील राष्ट्रवादीचे धडाडीचे कार्यकर्ते असून चंदगड तालुक्यात विद्यार्थी काँग्रेसचे चांगले काम करत आहेत. त्यांच्यावर आता तालुक्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून जोमाने काम करण्याच्या उद्देशाने ही जबाबदारी देण्यात आली आहे. 

       या निवडीबद्दल निखिल याचा नागनवाडी येथे राष्ट्रवादी चे प्रविण वांटगी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी भिकू गावडे,चंदगड अर्बन चे अध्यक्ष दयानंद काणेकर, बाळासाहेब बांदिवडेकर,लहू गावडे, नौशाद मुल्ला, कृष्णा पाटील,विजय काणेकर, विनायक दड्डीकर, विजय वणकूंद्रे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment