![]() |
वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कलिवडे (ता. चंदगड) गावचे सुपुत्र, विद्यामंदिर कलिवडे शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व चंदगड तालुका भाजप उपाध्यक्ष्य अशोक धाकलू कदम यांनी आपला वाढदिवस गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा करत समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला. याप्रसंगी भाजपा कोल्हापूर जिल्हा यांचेकडून शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका मदतनिस यांचा कोविड़ योध्दा म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी गावचे सरपंच अमृत दत्तू कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष विजय गावडे व सदस्य शिवाजी गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून अशोक कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शै. साहित्य वाटल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळे उपसरपंच अशोक पाटील, हलकर्णीचे माजी सरपंच नाईक, साकाव्य. समिती सदस्य रमेश पाटील, लक्ष्मण पाटील गणेश मंडळाचे अध्यक्ष आनंद गावडे, प्रकाश गुरव, निवृत्ती गावडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंगेश शिंदे व सतीश माने यांनी केले. आभार प्रदर्शन मुख्याध्यापक दत्तात्रय जोतिबा भाटे यांनी केले.
No comments:
Post a Comment