जंगमहट्टी येथे शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापनदिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

03 August 2021

जंगमहट्टी येथे शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापनदिन साजरा

चंदगड /  सी. एल. वृत्तसेवा

      जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील स्व. व्हि. बी. पाटील सह. दुध संस्थेत आज अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.                                                                                            प्रथम स्व. व्हि. बी. पाटील यांच्या फोटो  प्रतिमेचे पूजन उपस्थितांनी केले. जेष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून रविंद्र पाटील यांनी स्व. भाई दाजीबा देसाई, स्व. उज्वला कदम, स्व. राऊ धों. पाटील, स्व. कुसुमाताई पाटील, स्व.न. भु. पाटील, स्व. रा. न. पाटील, स्व. विष्णुपंत पाटील, स्व. कोलेकर, स्व. ना. रा. धामणेकर, स्व. हणमंत पाटील, स्व. हणमंत पाटील, स्व. म. ल. शिंदे, स्व. गुडोपंत हारकारे यांच्या कार्याचा उल्लेख केला. स्वातंत्र्य काळाच्या सुरूवातीपासून कष्टकरी, शेतकरी, कामगार बंधुच्या हितासाठी असलेल्या शे. का. पक्षाने कधीही पक्षाच्या विचारांशी तडजोड केली नाही. पुन्हा एकदा चंदगड विधानसभा मतदारसंघात पक्षाची मजबूत बांधणी करायची आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. येत्या पं. स. व जि. प. च्या निवडणुकीच्या तयारीला लागायचे आहे. असे मत पाटील यांनी व्यक्त केले. बाळु गावडे, सदानंद शिंदे, प्रकाश गावडे, रवळू गावडे, पुंडलिक पाटील, विठ्ठल भोसले, गुंडू नागुर्डेकर, शिवाजी गावडे, तानाजी कांबळे, अनिल नागुर्डेकर, नामदेव जाधव, निवृत्त पाटील उपस्थित होते. आभार निवृत्ती पाटील यांनी मानले. शेतकरी कामगार पक्षाच्या नावाचा जयघोष करीत कार्यक्रमाची सांगता झाली. No comments:

Post a Comment