हलकर्णी येथे शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापनदिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

03 August 2021

हलकर्णी येथे शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापनदिन साजरा

हलकर्णी (ता. चंदगड) येथे मुख्य रस्त्यावरून पदफेरी काढून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेधार्थ घोषणा देताना शेकापचे कार्यकर्ते. 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         हलकर्णी (ता.चंदगड) येथे अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा
७४ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.                                                             प्रथम पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मुख्य रस्त्यावरून पदफेरी काढून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. तसेच नुकताच झालेल्या महापुरामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत करण्यात यावी. महागाई कमी करून दिलासा द्यावा पेट्रोल, डिझेल दरवाढ रोखावी इत्यादी मागण्यांसाठी घोषणा देण्यात आल्या. यावेळी चंद्रकांत बागडी, परशुराम निट्टूरकर, जानबा वर्षे, सोमनाथ खनगुटकर, महादेव आवडत, नारायण गावडे, प्रकाश पाटील, भरमु पेडणेकर इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment