प्रा. गावडे यांची कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2021

प्रा. गावडे यांची कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

 

प्रा. आर. बी. गावडे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            हलकर्णी (ता. चंदगड) येथील  गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील हिंदी या विषयाचे प्रा. आर.बी गावडे यांची कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. ते मूळचे नागणवाडी गावचे असून महाविद्यालयात गेली २६ वर्षे हिंदी व शिक्षण शास्त्र विषयाचे अध्यापन करत आहेत. चंदगड तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रश्नसंबंधित शैक्षणिक समस्यासंबंधी सातत्याने ते कार्यरत असतात. त्यांच्या याच अनुभवाच्या बळावर कार्यकारणीच्या बैठकीत त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य पी. ए. पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
No comments:

Post a Comment