पाटणे वनविभागाकडुन गव्याच्या हल्यातील जखमी कर्नाटकातील मेंढपाळास मदत - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2021

पाटणे वनविभागाकडुन गव्याच्या हल्यातील जखमी कर्नाटकातील मेंढपाळास मदत

पाटणे येथे गव्याच्या हल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला धनादेश वितरण करताना आमदार राजेश पाटील, वनश्रेत्राल दत्ता पाटील, भांडकोळी, धामणकर आदी. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        कालकूंद्री (ता. चंदगड) येथे  १७ एप्रिल २१ रोजी गवा हल्ल्यात जखमी झाले मेंढपाळ बसप्पा बिराप्पा हारुगिरी (रा. सलामवाडी, कर्नाटक) यांना वनविभागामार्फत आमदार राजेश पाटील यांचे हस्ते एक लाख पंचवीस हजारचा धनादेश प्रदान करण्यात आला. 

       एप्रिल मध्ये कालकुंद्री येथील बाजीराव पाटील यांच्या शेतात मेंढया चारत असताना वाट चुकून बिथरलेल्या गव्याने अचानकपणे हल्ला करुन  बसप्पा यां धनगाराला गंभीर जखमी केले होते. ते मुळचे कर्नाटकातील असलेने प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड येथे प्रथोमोपचार केले नंतर त्यांचे नातेवाईकांनी त्यांना राजीव गांधी ग्रामीण रुग्णालय यमकनमर्डी (ता. हुकेरी) येथे दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच प्र. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील हे वनपाल जी. एम. होगाडे व लहु पाटील यांचेसह यमकनमर्डी येथे जाऊन जखमी व नातेवाईकांची विचारपुस केली. तेथील अपुरी उपचार यंत्रणा व जखमी यांची नाजुक अवस्था पाहुन त्यांना गडहिंग्लज येथील हत्तरकी हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांचेवर पुढील उपचार करुन सुखरूप घरी पाठविले. दरम्यानचे काळात लॉकडाऊनमुळे वनविभागाने पुढाकार घेऊन स्वत : कागदपत्रांची जमवा - जमव केली. त्याकामी त्यांना कालकुंद्री येथील शिक्षक श्रीकांत पाटील यांचे सहकार्य लाभले. कोरोना काळात निधीची कमतरता असताना उपवनसंरक्षक कोल्हापुर आर. आर. काळे यांनी विशेष बाबींतुन निधी दिला. प्र. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील व त्यांचे सहकारी यांनी मेंढपाळ कुटूंबास आर्थीक मदत देणेसाठी केलेले कार्य व केलेली धडपड ही कौतुकाची बाब असुन त्यांचे माणुसकी व कर्तव्यात राज्य हदद सिमा कोठेच अडथळा ठरली नाही. असे गौरोदगार आ.पाटील यांनी काढले. तसेच जखमी मेंढपाळ व त्यांचे वडील यांनी दिलेल्या आर्थीक मदतीबाबत आपण कृतज्ञ असुन अशी माणुसकी व आपुलकी आपण कुठेच पाहीली नाही. असे सांगताना त्यांचे डोळे पान्हावले होते. यावेळी विविध पदाधिकाऱ्यासह वनपाल बी. आर. भांडकोळी, एन. एम. धामणकर, वनरक्षक दिपक कदम, डि. एस. रावळेवाड, डि. एम. बडे, एम. एम. हुल्ले  व वनकर्मचारी लहु पाटील व विश्वनाथ नार्वेकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment