महागाव येथे शिवशंकर भाऊ पाटील यांना आदरांजली - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2021

महागाव येथे शिवशंकर भाऊ पाटील यांना आदरांजली

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     शेगाव (जि. बुलढाणा) येथील संत गजानन महाराज शेगाव  संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले त्यांना महागाव येथील संत गजानन शिक्षण समूह कडून  आदरांजली वाहण्यात आली.

     "शिव शंकर भाऊ यांच्या निधनामुळे आयुष्यभर निस्वार्थपणे संत गजानन महाराजांची सेवा करणारे  ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. एक वृतस्थ सेवेकरी, निष्काम कर्मयोगी, अध्यात्माच्या माध्यमातून मानवतेचे महान डोंगर उभा करणारा महान व्यक्तिमत्त्व हरपला. त्याचे काम आजच्या युवकांना प्रेरणादायी असून ती नेहमी स्मरणात राहतील. अशा शब्दात संस्थाध्यक्ष डॉ. अण्णासाहेब चव्हाण यांनी आदरांजली वाहिली.

     यावेळी डॉ. यशवंत चव्हाण, डॉ,संजय चव्हाण, सचिव डॉ. बाळासाहेब चव्हाण, डॉ. संजय दाभोळे, डॉ. मंगल मोरबाळे, डॉ. एस. एच. सावंत, डॉ.अन्सार पटेल, श्रीकांत हेब्बाळकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.No comments:

Post a Comment