महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर कोगनोळी येथे लावलेली तपासणी हटवण्यासाठी शिवसेनेने केले आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2021

महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर कोगनोळी येथे लावलेली तपासणी हटवण्यासाठी शिवसेनेने केले आंदोलन

कोगनोळी येथील तपासणी हटविण्यासाठी शिवसेनेने केले आंदोलन.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       महामार्गावरून कागल,आजरा, चंदगड, गडहिंग्लज, या महाराष्ट्राच्या  तालुक्यातील नागरिकांची ये जा असते.आर्टिफिसीआर टेस्ट असेल तरच या नाक्यावरून सोडलं जाते. या कर्नाटक सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी व सीमा भागातील नागरिकांच्या वर होणाऱ्या अन्याय थांबवण्यासाठी आज कोल्हापुर जिल्हा शिवसेनेच्या वतीने महामार्गावर कर्नाटक सरकारला जाब विचारण्यात आला.वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाबरोबर बोलणी करून सीमा भागातील लोकांना आधार कार्ड बघून सोडण्याची ग्वाही देण्यात आली. 
           चार दिवसांपूर्वी शिवसेनेने सनदशीर मार्गाने निवेदन देऊन ही   यावर कार्यवाही झाली नसल्याने दुसऱ्या मार्गावरील कर्नाटक पासिंगच्या गाड्या अडवण्यात आल्याने, शिवसैनिकांना अटक झाली. त्यानंतर वरिष्ठांशी बोलून सीमा भागातील लोकांना तवंदी घटापर्यंत महामार्ग खुला करून देण्याचे अश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख  विजय देवणे, संजय पवार,  सुजित चव्हाण,अशोक पाटील, कोल्हापूर शहर प्रमुख रविकिरण इंगवले, युवा सेने जिल्हा प्रमुख संदीप पाटील, ग्राहक सेनेचे तालुका प्रमुख राजू रेडेकर, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रतीक क्षीरसागर, कागल युवा सेने तालुका प्रमुख संदीप सरदेसाई शिवसैनिक व महिला पदाधिकरी  उपस्थित होते.



No comments:

Post a Comment