महापुरामुळे नुकसान झालेल्यांना तातडीने मदत द्यावी, वंचित बहुजनची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2021

महापुरामुळे नुकसान झालेल्यांना तातडीने मदत द्यावी, वंचित बहुजनची मागणी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे सर्वत्र महापुर आला. वर्षाची सरासरी एका आठवड्यात झाली. त्यामुळे शेतकरी व नागरिक विस्थापित झाले.पिक वाहुन गेली, जनावरे दगावली, दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, वित्तहानी झाली. अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा प्रकारे अडचणीत आलेल्यांना सरकारी निकषानुसार त्वरित मदत करण्यात यावी अशा  मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी चंदगड तालुकाच्या वतीने नुकताच चंदगड तहसीलदार यांना देण्यात आले.

           महापुरामुळे नुकसान झालेल्यांना संमधीत सर्व शेतकरी, नागरिकांना त्वरित मदत करण्यात यावी, महावितरण कडून केली जाणारी वीज बीले वसुली थांबवण्यात यावी, पुरग्रस्तांना कौटुंबिक साहित्य, सामुग्री द्यावी, जनावरांच्या् चारा व लसीकरण  करण्यात यावे, महापुरामुळे कुुुटुंबाााातील रेशनकार्ड, आधारकार्ड इ गहाळ झाले आहेत. अशांना ते मिळणं कठीण होऊ नये म्हणून कॅंम्पचे नियोजन करावे अशा इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर अध्यक्ष संघर्ष प्रज्ञावंत, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कांबळे, धैर्य वर्धन पुंडकर, विलास कांबळे, सुभाष कांबळे इत्यादींच्या सह्या आहेत.




No comments:

Post a Comment