सीमाप्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोदींना पत्र, काय केली आहे मागणी, वाचा.......... - चंदगड लाईव्ह न्युज

12 August 2021

सीमाप्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोदींना पत्र, काय केली आहे मागणी, वाचा..........

उपमुख्यमंत्री अजित पवार

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सीमा भागातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करावा अशी विनंती करणारी पत्रे पाठवण्याची मोहीम महाराष्ट्रवादी संघटनांनी सुरू केली आहे. या मोहिमेला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. 

       कर्नाटकच्या जाचक वरवंट्याखाली मरण यातना भोगणाऱ्या बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आदी शेकडो मराठी बहुभाषिक गावातील जनता गेली ६५ वर्षे महाराष्ट्रात येण्यासाठी टाहो फोडत आहे. याप्रश्नी अनेक वेळा झालेल्या आंदोलनात शेकडो मराठी भाषिक शहीद झाले आहेत. सनदशीर मार्गाने तीन पिढ्या  चाललेला हा जगातील एकमेव सत्याग्रह आहे. या सर्व बाबींचा विचार करून ही  मराठी भाषिक गावे विनाविलंब महाराष्ट्रात सामिल करावी. अशी मागणी पत्रातून ना. अजित पवार यांनी प्रधानमंत्री यांना केली आहे.

No comments:

Post a Comment