जय मल्हार क्रांती संघटना युवा तालुका कार्याध्यक्षपदी कालकुंद्रीचे मारुती नाईक - चंदगड लाईव्ह न्युज

21 August 2021

जय मल्हार क्रांती संघटना युवा तालुका कार्याध्यक्षपदी कालकुंद्रीचे मारुती नाईक

 

मारुती नाईक

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याच्या चंदगड तालुका युवक कार्याध्यक्षपदी कालकुंद्री (ता. चंदगड) येथील मारुती निंगाप्पा नाईक यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र  युवक जिल्हाध्यक्ष भरत नाईक यांनी नुकतेच नेसरी येथील कार्यक्रमात प्रदान केले.

मारुती नाईक यांना निवडीचे पत्र देताना संघटनेचे पदाधिकारी.

      आद्य क्रांतिवीर उमाजीराजे नाईक यांना प्रेरणास्थान माणून जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्रातील बेरड, बेडर, रामोशी, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत आहे. या संघटनेच्या चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यांत जिल्हा, तालुका, शहर प्रमुख आदी  पदाधिकारी निवडीसाठी व्ही के चव्हाण- पाटील महाविद्यालय पाटणे फाटा, ता. चंदगड येथे कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तीत ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी राज्य युवा प्रवक्ता अमोल नाईक, निरीक्षक म्हणून आनंदराव जाधव, प्रवीण नाईक, काकासाहेब चव्हाण, रोहित मलमे, राज मदने, सिताराम नाईक, सुभाष नाईक, परसू नरी, आप्पा चिंचणगी, जयवंत नाईक, संजय नाईक उपस्थित होते.

     नूतन कार्याध्यक्ष मारुती नाईक यांना कालकुंद्री येथील युवक मंडळाचे कार्यकर्ते परशराम स. नाईक, परशराम क. नाईक, मारुती रमेश नाईक, भरत नाईक, मोहन नाईक, ऋतिक नाईक, लक्ष्मण शि. नाईक, बालाजी नाईक, महादेव लोहार आदींचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment