कोवाड येथील 'साहित्यिक पांडुरंग कुंभार प्रतिष्ठान' चे पुरस्कार घोषित - चंदगड लाईव्ह न्युज

21 August 2021

कोवाड येथील 'साहित्यिक पांडुरंग कुंभार प्रतिष्ठान' चे पुरस्कार घोषित

डॉ. प्रभाकर शेळके

विठ्ठल गावस


बा. स. जठार

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       कोवाड (ता. चंदगड) येथील सिध्दहस्त ग्रामीण साहित्यिक पांडुरंग कुंभार यांच्या निधनानंतर कुटुंबिय व तालुक्यातील साहित्य प्रेमींनी 'साहित्यिक पांडुरंग कुंभार प्रतिष्ठान' स्थापन केले आहे. प्रतिष्ठान मार्फत उदयोन्मुख साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. यंदा या पुरस्कारांचे पहिलेच वर्ष असून या वर्षीच्या पुरस्कारासाठी तीन लेखकांची निवड करण्यात आली आहे.

          प्रथम पुरस्कार डॉ. प्रभाकर शेळके, जालना (व्यवस्थेचा बैल), द्वितीय पुरस्कार विठ्ठल गावस, डिचोली- गोवा (फिंगर बाउल-कथासंग्रह) तर विशेष पुरस्कारासाठी बा. स. जठार- वाघापूरकर, गारगोटी (भाकरीची शपथ- कथासंग्रह) हे लेखक व त्यांच्या साहित्यकृती पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, गौरवपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक पां. कुंभार यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment