ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध मागण्याबाबत आमदार राजेश पाटील यांना निवेदन, काय आहेत मागण्या.......वाचा..... - चंदगड लाईव्ह न्युज

21 August 2021

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध मागण्याबाबत आमदार राजेश पाटील यांना निवेदन, काय आहेत मागण्या.......वाचा.....

 

ग्रामपंचात कर्मचारी आमदार राजेश पाटील यांना मागण्यांचे निवेदन देताना. 

माणगाव / प्रतिनिधी

        शासन निर्णय प्रमाणे ग्रा. पं. कर्मचारी यांना किमान वेतन लागू करणे,  राहणीमान भत्ता अदा करावा , पगारातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधी ची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, ऑनलाईन पगारातून ग्रा.पं. कडील शिल्लक पगार रक्कम कर्मचाऱ्यांच्या खत्यावर जमा करावी,कर्मचारी मयत झालेस त्यांच्या कुटूंबातील व्यक्तीला अनुकंप तत्वावर ग्रा.पं. मध्ये समाविष्ट कराव आदी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडाव्यात याबााब त  ग्रामपंचायत कर्मचारी युनियन च्या वतीने आम.राजेश पाटील याना निवेदन देण्यात आले .या मागण्याबाबत अर्थ मंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांची भेट घेऊन स्वतः पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार. राजेश पाटील यांनी या वेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिले.अध्यक्ष संजय कांबळे , उपाध्यक्ष गावडू पाटील , सचिव संतोष दळवी, अनंत कदम, अमृत मसुरकर , विष्णू वंजारी , रखी तराळ , सुभाष गावडे, जोतिबा शिंदे , दत्तू देवलकर , नवनाथ कांबळे , गोपाळ गायकवाड , बाळू गावडे , वैजनाथ अडकुरकर , पुंडलिक नाईक आदी कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment