चंदगड तालुक्यातील सुरेश दळवी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सेक्रेटरीपदी फेरनिवड - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2021

चंदगड तालुक्यातील सुरेश दळवी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सेक्रेटरीपदी फेरनिवड

सुरेश दळवी


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          अडकूर (ता. चंदगड) येथील रहिवासी व काँग्रेस पक्षाचे जुने कार्यकर्ते सुरेश दळवी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी पदी फेर निवड करण्यात आली आहे.अखिल काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधीजी यांच्या मान्यतेनुसार प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांच्या सोबत प्रदेश कॉग्रेस मध्ये संघटनात्मक काम करण्याची पुन्हा संधी देण्यात आली. माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या प्रयत्नाने दळवी याना पुन्हा संधी मिळाली आहे.

         सुरेश दळवी हे गेली ३८ वर्ष काँग्रेस पक्षात काम करत असून, प्रदेश युवक काँग्रेसचे ते ८ वर्ष सरचिटणीस आणि प्रवक्ता म्हणून  उत्कृस्ट काम पाहिले आहे. मिरा भाईंदर युवक काँग्रेसचे सरचिटणीस, मिरा भाईंदर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ता म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले आहे. मिरा भाईंदर महापालिका शिक्षण मंडळाचे उपसभापती म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. मिरा भाईंदरमधील मराठा समाजाची प्रातिनिधिक संघटना मिरा भाईंदर मराठा संघाचे अध्यक्ष म्हणून ते १९ वर्ष काम पहात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाची विविध आंदोलने,समाजाची संमेलन आयोजित करण्यात आले होते. मिरा भाईंदर शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा संस्थांशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध आहे. सध्या त्यांचे वास्तव्य अडकुर येथे असून चंदगड तालुक्यातील किंबहुना जिल्ह्यातील काँग्रेस संघटना बळकट करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. विभागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी तत्परतेने मदत करण्यासाठी पुढे असतात. त्यांची प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल चंदगड तालुक्यात अभिनंदन होत आहे.
फोटो ओळी :-- सूरेश दळवी

Attachments area


No comments:

Post a Comment