चंदगड पोलिस ठाण्याकडून कानडीमध्ये अन्नधान्य वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2021

चंदगड पोलिस ठाण्याकडून कानडीमध्ये अन्नधान्य वाटप

                       कानडी येथे गरजूना अन्नधान्य वाटप करताना चंदगड पोलिस ठाण्याचे कर्मचारी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

    कोल्हापूर पोलिस दलाच्या वतीने परेशन संवेदना अंतर्गत चंदगड पोलीस ठाण्याकडून २०२१ च्या महापुरात नुकसान झालेल्या कानडी (ता. चंदगड) येथील गरीब व गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. चंदगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक  बी. ए. तळेकर  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक  श्री. सरमळे व पोलिस नाईक श्री. सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. याबद्दल चंदगड पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment