श्री रामलिंग हायस्कूल व ज्युनि.कॉलेज,तुडयेचा विक्रम, तब्बल २१ विद्यार्थ्यांचे NMMS परीक्षेत यश १० लाख ८o हजारांची शिष्यवृत्ती मिळणार - चंदगड लाईव्ह न्युज

20 August 2021

श्री रामलिंग हायस्कूल व ज्युनि.कॉलेज,तुडयेचा विक्रम, तब्बल २१ विद्यार्थ्यांचे NMMS परीक्षेत यश १० लाख ८o हजारांची शिष्यवृत्ती मिळणार

 

एनएमएमएस परिक्षेत शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक आर .डी. पाटील यांचा सत्कार करताना प्राचार्य एस .जी. पाटील

तेऊरवाडी / एस. के. पाटील

         श्री रामलिंग हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, तुडये (ता. चंदगड) च्या  २१ विद्यार्थ्यांनी NMMS परिक्षेत विक्रम  केला. नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. 

        शिष्यवृत्तीधारक प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी १२००० रूपये याप्रमाणे ४ वर्षात ४८००० रुपये इतकी भरघोस शिष्यवृत्ती मिळणार आहे . याप्रमाणे हे सर्व विद्यार्थी तब्बल १००८००० (दहा लाख आठ हजार रूपये) इतक्या रकमेच्या शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत. 

शिष्यवृत्तीचे मानकरी विद्यार्थी पुढीलप्रमाणे,

१) अथर्व दयानंद पाटील

२) शिवानी मनोहर मलत वाडकर

३) साक्षी रामलिंग कलजी

४) कुमार वैजनाथ उसणकर

५) तनवी सोमनाथ पाटील

६)संजिवनी महादेव मयेकर

७) रेखा वैजनाथ उसणकर

८) रोहन हणमंत नेवगिरे

९) आदिती शंकर पाटील

१०) सरीता लक्ष्मण पाटील

११)कस्तुरी रामलिंग गुरव

१२) प्रदीप परशराम पाटील

१३) मंथन रामलिंग उसणकर

१४) प्राजक्ता परशराम पाटील

१५) श्रृती लक्ष्मण नेवगिरे

१६) रोशन संजय मोहिते

१७) रेखा निळकंठ गाडेकर

१८) गायत्री महादेव पाटील

१९) वैभव विजय नावगेकर

२०) सानिया कल्लापा मोहिते

२१) संजीवनी तानाजी पाटील

          यासाठी या विद्यार्थी - विद्यार्थिनिना संस्थेचे सचिव आमदार राजेश पाटील, अध्यक्ष महादेव मंगेश पाटील यांचे प्रोत्साहन तर प्राचार्य एस. जी. पाटील, माजी प्र. प्राचार्य ए. वाय. पाटील, आर. डी. पाटील  यांच्यासह सर्व  शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थीं- विद्यार्थिनिंचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment