गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजरा पोलीस ठाण्यात पोलिस पाटलांची बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

20 August 2021

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजरा पोलीस ठाण्यात पोलिस पाटलांची बैठक

                             आजरा येथे पोलिस पाटील यांना मार्गदर्शन करताना स. पो. नि. बालाजी भांगे.

आजरा / सी. एल. वृत्तसेवा

         आजरा पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  पोलीस पाटीलांची बैठक घेऊन सर्वाना मार्गदर्शक सूचना देणेत आल्या. आज प्रशासकिय इमारतीच्या सभागृहात, आजरा पोलीस ठाणे यांच्या वतीने आयोजित आगामी गणेशोत्सवच्या संदर्भात पोलीस पाटील मिटींग पार पडली. स. पो. नि. बालाजी भांगे यांनी कोविड च्या परिस्थितीचे भान ठेवून तसेच शासनाच्या मार्गदर्शिकेनुसार, डॉल्बी व वाद्य विरहित गणेशोत्सव साजरा करणेचे आवाहन केले. तसेच एक गाव एक गणपती साजरा करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी पो. हे. कॉ म्हसवेकर, पो. हे. कॉ. देऊस्कर, गोपनीय पो. हे. कॉ. तराळ यांचेसह 60 पोलीस पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment