कोवाड - बेळगाव मार्गावर काही दिवसापासून प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे. अतिवाड फाटा येथे दोन्ही बाजूला चंदगड व बेळगाव तालुक्यातील खासगी प्रवाशी वाहतुक सेवा सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव तालुक्यातील वडाप वाहने व पलिकडे कोवाड परिसरातील वडाप वाहने सुरु झाल्याने चंदगड तालुक्यातील कोवाड परिसरातील 40 हून अधिक गावांतील ग्रामस्थांना बेळगाव येथे दवाखान्यासाठी, व्यापारासाठी प्रवास सोयीचा झाला आहे.
गत दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधून-मधून अतिवाड फाटा व बाची नाका येथे चेकपोस्ट सुरु करुन बेळगाव व चंदगड तालुक्यात ये-जा करणार्या प्रवाशांवर निर्बंध घालण्यात येत होते. मात्र चार दिवसांपासून बेळगाव ते अतिवाड फाटा या दरम्यान बेळगाव तालुक्यातील वडाप वाहनाने प्रवास सुरु आहे. तर पुढे कोवाड येथे जाण्यासाठी सीमेपलिकडे चंदगड तालुक्यातील वडापची वाहने उपलब्ध होत आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना आता बेळगाला ये-जा करणे सोयीचे ठरत आहेत. गत दोन वर्षापासून चंदगड तालुक्यातून बेळगावला ये-जा करणार्या मालवाहतूक वाहनावर निर्बंध लादल्याने व्यापार्यांचे लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.
अतिवाड, बेकीनकेरे, मण्णूर, उचगाव, सुळगा, हिंडलगा, तुरमुरी या परिसरातील शेकडो कामगारांनाही आता चदंगड तालुक्यात सरळ प्रवेश करता येत आहे. तर पै-पाहुण्यांना एकमेकांकडे जाण्यासाठी वडापचा आधार मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment