अतिवाड स्पर्धेतील २१ विजेत्यांना दिड लाखांची बक्षिसे, जाफरवाडीची जोडी प्रथम तर कुदनूरची सिध्देश्वर प्रसन्न तृतिय - चंदगड लाईव्ह न्युज

30 September 2021

अतिवाड स्पर्धेतील २१ विजेत्यांना दिड लाखांची बक्षिसे, जाफरवाडीची जोडी प्रथम तर कुदनूरची सिध्देश्वर प्रसन्न तृतिय

अतिवाड : विजेत्या बैलजोडी मालकांसह स्पर्धेचे आयोजक.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

         अतिवाड (ता. बेळगाव) येथे श्री सातेरी देवी प्रसन्न मंडळ तर्फे झालेल्या बैलगाडी स्पर्धेत जाफरवाडी (बेळगाव) येथील बसवेश्वर प्रसन्न या बैलजाडीने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितिय क्रमांक चव्हाटा प्रसन्न (वाघवडे, बेळगाव) तर  तृतिय क्रमांक सिध्देश्वर प्रसन्न (कुदनूर, ता. चंदगड) यांना मिळाला. एकूण 21 विजेत्यांना एकूण दीड लाख रुपयांची बक्षिसे व चषके देण्यात आली. 

     स्पर्धेसाठी लक्ष्मीताई हेब्बाळकर फाउंडेशनचे अध्यक्ष मृणाल हेब्बाळकर, सामाजिक कार्यकर्ते जयवंत बाळेकुंद्री, आनंद पाटील, गावडू पाटील, उमेश पाटील,  ग्रा. पं. सदस्य मल्लाप्पा पाटील, भरमा व्हरकेरी, विद्या पाटील, वनिता मण्णूरकर, कृष्णा पाटील, सोमनाथ पाटील, दिपक केसरकर, भास्कर सुतार, नितिन पाटील, तैसिफ तशिलदार, भरमा पाटील, शिवाजी बोकमुरकर, आप्पाजी कणबरकर, आप्पाराव येळळूरकर, प्रकाश भातकांडे, भैरु डोंगरे, कल्लाप्पा कणबरकर, अजित बेपारी, परशराम पाटील यांचा मंडळातर्फे सन्मान करण्यात आला. या मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले. 

           या शिवाय अनुक्रमे सातेरीदेवी प्रसन्न (अतिवाड), बेकनाई प्रसन्न (बेटगिरी), बसवेश्वर प्रसन्न (बसरीकट्टी), श्री कलमेश्वर प्रसन्न (अनगोेळ),  सुशीला शिवगोडे प्रसन्न, राम लक्ष्मण सिध्देश्वर प्रसन्न (राजहंसगड), परमेश्वर प्रसन्न (कालकुंद्री),  परमेश्वर प्रसन्न (कालकुंद्री-सदावरवाडी), अंजनेय प्रसन्न (आलारवाड), सिद्धनाथ प्रसन्न (बैलूर), शिवशंकर प्रसन्न (मुतगा),  सिद्धनाथ पावणाई (बैलूर), ज्योतिर्लिंग प्रसन्न (बेळगुंदी), नागनाथ प्रसन्न (बेकीनकेरे), रवळनाथ प्रसन्न (पोवाचीवाडी, चंदगड), भावेश्वरी प्रसन्न (हेब्बाळ) , ब्रह्मलिंग प्रसन्न (तेऊरवाडी, चंदगड) यांना अनुक्रमे क्रमांक मिळाले. 

            मंडळाचे अध्यक्ष गोपाळ पाटील, सेक्रेटरी नारायण पाटील, खजिनदार एन. पी. पाटील, तानाजी पाटील, सुरेश पाटील, महेश पाटील, यल्लाप्पा पाटील, वसंत पाटील, अशोक पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

           या स्पर्धेसाठी लक्ष्मीताई हेब्बाळकर फौडेशनचे अध्यक्ष मृणाल हेब्बाळकर, मण्णूर येथील सामाजिक कार्यकर्ते जयवंत बाळेकुंद्री यांनी 25 हजार रु. देणगी दिली. तर आनंद पाटील, गावडू पाटील, उमेश पाटील,  ग्रा. पं. सदस्य मल्लाप्पा पाटील, भरमा व्हरकेरी, विद्या पाटील, वनिता मण्णूरकर, कृष्णा पाटील, सोमनाथ पाटील, दिपक केसरकर, भास्कर सुतार, नितिन पाटील, तैसिफ तशिलदार, भरमा पाटील, शिवाजी बोकमुरकर, आप्पाजी कणबरकर, आप्पाराव येळळूरकर, प्रकाश भातकांडे, भैरु डोंगरे, कल्लाप्पा कणबरकर, अजित बेपारी, परशराम पाटील यांनी देणगी दिल्या. 

No comments:

Post a Comment