हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस स्वीकारताना मोहन कांबळे. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कोरोना महामारी ला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत शासकीय स्तरावर पंचायत समिती चंदगड मार्फत सामाजिक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यात चंदगड विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी निबंध, पोस्टर, स्लोगन, हस्ताक्षर आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील हस्ताक्षर स्पर्धेत कालकुंद्री, ता. चंदगड येथील लोकनेते तुकाराम पवार ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मोहन गुरुनाथ कांबळे याने प्रथम क्रमांक
स्लोगन स्पर्धेचे बक्षीस स्वीकारताना बुद्धभूषण कांबळे |
तर स्लोगन स्पर्धेत सरस्वती विद्यालयचा बुद्धभूषण कल्लापा कांबळे याने द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सभापती अनंत कांबळे, जि प सदस्य सचिन बल्लाळ, उपसभापती मनीषा शिवणगेकर व सर्व पंस सदस्य उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एस एल बेळगावकर व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment