विझणे शाळेचे स्लोगन स्पर्धामध्ये यश, आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

30 September 2021

विझणे शाळेचे स्लोगन स्पर्धामध्ये यश, आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते गौरव

विद्या मंदिर विंझणेचा विद्यार्थी विनायक कांबळे व मुख्याध्यापक श्री कदम यांचा गौरव करताना आमदार राजेश पाटील सोबत सभापती अँड. कांबळे

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड विधानसभा मतदार संघात माझे कुटूंब- माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत  पंचायत समिती चंदगड यांचेकडून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मराठी विद्यामंदिर विंझणे चा विद्यार्थी विनायक कांबळे याने स्लोगन स्पर्धा प्रकारात चंदगड विधानसभा मतदार संघात तृतिय क्रमांक प्राप्त केला.

    चंदगड पंचायत समिती येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते कु. विनायक कांबळे व मुख्याध्यापक टी. एम. कदम यांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.  यावेळी चंदगड पं. स. सभापती अँड. अनंत कांबळे, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, पं. स. सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते. कु. विनायकला मुख्याध्यापक टी. एम. कदम, विठ्ठल पिटुक व निवृत्ती तिबिले यांचे मार्गदर्शन लाभले. विनायकच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment