![]() |
कोनेवाडी (ता. चंदगड) येथे शालेय विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी उपस्थित मान्यवर. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कोनवाडी (ता. चंदगड) येथे प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने एनएमएमएस परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या कोनेवाडी येथील पुनम जानबा गावडे व सविता कृष्णा सुतार यांचा प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष वैजनाथ केसरकर यांच्या हस्ते सत्कार झाला.
त्याचबरोबर कर्णबधीर व मुकबधीर दिव्यांग बांधवांना केंद्र शासनाचे युडी आयडी कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांचाही सत्कार करण्यता आला. कार्यक्रमाला सरंपच ज्ञानदेव गावडे, उपसरपंच नर्मदा धुमाळे, ग्रामसेवक अंकुश गाडेकर, पांडुरंग गावडे, शिक्षक श्री. जोशी, श्री. गावडे यासह शालेय कमिटी सदस्य, कोनेवाडी शाळेतील शिक्षक उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष वैजनाथ केसरकर यांचाही सत्कार झाला.
No comments:
Post a Comment