जखमी घुबडास निसर्गात सोडले, गव्हाणी घुबड पुन्हा निसर्गात झेपावले, पाटणे वनविभागाचे कार्य - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2021

जखमी घुबडास निसर्गात सोडले, गव्हाणी घुबड पुन्हा निसर्गात झेपावले, पाटणे वनविभागाचे कार्य

पाटणे (ता. चंदगड) येथे जखमी घुबडास निसर्गात सोडताना वनक्षेत्रपाल पी. ए. आवळे, डी. एच. पाटील, गणेश बोगरे आदी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        पाटणे (ता. चंदगड) येथील वन विभागाने देवरवाडी परिसरात जखमी आवस्थेत सापडलेल्या गव्हाणी घुबडावर उपचार करून मुळ अधिवासात सोडण्यात आले. 

     २० ऑगस्ट रोजी शिनोळी येथील अभिजित जाधव यांना वैजनाथ देवालय परिसरात जखमी गव्हाणी घुबड दिसले. त्यांनी याबाबत वनविभगास कल्पना दिली. माहिती मिळताच वनरक्षक दिपक कदम, गणेश बोगरे, गिरीष वळवी यांनी घुबडाला पशुवैघकिय अधिकारी यांना दाखविले. मात्र त्याचा डावा पंख तुटल्याने त्याला उडता येत नव्हते. वनक्षेत्रपाल पी. ए. आवळे यांनी जखमी घुबडास पुढील उपचारासाठी पाठविण्याच्या सुचना दिल्या. कोल्हापूर येथे वनविभागाचे मानद पशुधन अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांनी  घुबडावर यशस्वी शस्त्रक्रिया करून तब्बल १ महिन्याच्या वैद्यकिय देखभाली नंतर सदर गव्हाणी घुबडाला पाटणे जंगल परिसरात सोडून देणेत आले. यावेळी वनक्षेत्रपाल पी. ए. आवळे, वनपाल डी. एच. पाटील, बी. आर. भांडकोळी, वनरक्षक गणेश बोगरे, वनमजुर मोहन तुपारे, हंगामी वाहन चालक विश्वनाथ नार्वेकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment